धोनीच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीसोबत क्रिती सेनन रिलेशनशिपमध्ये? फोटोंमुळे चर्चा

क्रितीने अधिकृतपणे आपले रिलेशनशिप जाहीर केलेले नाही, पण अलीकडेच तिचे ख्रिसमस सेलिब्रेशनसोबतचे एक सुंदर दृश्य समोर आले आहे. गेल्या महिन्यात, तिने तिच्या कथीत बॉयफ्रेंडसोबत एकत्र ख्रिसमस साजरा केला, ज्यात भारतीय क्रिकेटर एमएस धोनी(Dhoni) आणि त्यांची पत्नी साक्षी धोनीही सहभागी झाले होते. क्रिती धोनीच्या पार्टीत उपस्थित होती, असंही बोललं जातंय आणि तिथे तीने तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत हजेरी लावलेली दिसली होती. त्यानंतर हे दोघे एकत्र बाहेर फिरायला गेल्याची ही चर्चा सुरु आहे, कारण या दोघांचा एकत्रित पुलमधील फोटो व्हायरल झाला आहे.

कबीरचे वडिल कुलजिंदर बहिया यांनी ‘साउथॉल ट्रॅव्हल’ नावाची प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी सुरू केली आहे, ज्याचे मुख्यालय यूकेमध्ये आहे. कबीरचे कुटुंब लंडनमध्ये राहते. 2019 मध्ये, कबीरचे नाव संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीत सामील करण्यात आले होते.

कबीर आणि धोनीचे(Dhoni) कुटुंबियांच्या घनिष्ठ संबंधांबद्दलही चर्चा आहे. धोनीची पत्नी साक्षी आणि कबीर यांचे एकत्र मोठे नाते असल्याचे समजले जाते आणि साक्षी कबीरची बहीण असल्याचे देखील बोलले जाते. कबीर आणि धोनीचे कुटुंब एकत्र वेळ घालवतात, व्हेकेशनवर जातात आणि ते एकमेकांशी जवळीक राखतात. कबीर हा हार्दिक पांड्याच्या उदयपूरमधील लग्नात सहभागी झाला होता आणि त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले जाते.

हे सर्व संकेत देतात की कबीर बहिया आणि क्रिती सेनन यांचे रिलेशनशिप एक खास नातं असू शकते, ज्यात त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय सुद्धा सहभाग घेत आहेत. या दोघांची आपली खासियत आणि मित्रपरिवारासोबतच्या घनिष्ठ संबंधांमुळे त्यांचे रिलेशनशिप एक खास चर्चा विषय ठरले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! CM यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

‘महिलांना घरात अधिकार देऊ नका, अन्यथा…’; युवराज सिंहच्या वडिलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

BSNL चा फक्त कॉलिंगसाठी खास प्लॅन, 90 दिवसांची वैधता