छत्रपती संभाजी महाराजांबद्दल KRK चं वादग्रस्त ट्विट

छावा चित्रपटाने धुमाकुळ घातलाय. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना(Entertainment news) यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून, थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

तर दुसरीकडे अभिनेता कमाल खानने विकीपीडियाचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाले असून त्यांनी विकीपीडियाशी संपर्क साधत वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदी चित्रपटांतील(Entertainment news) अभिनेता आणि स्वतःला सिने समीक्षक म्हणवून घेणाऱ्या कमरान अकमाल खानने विकीपीडियावरील आक्षेपार्ह मजकुराचा आधार घेत वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विकिपीडियाशी संपर्क साधत मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकीपीडियावर आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुखांना मी सांगितलं आहे की विकिपीडिया आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांशी बोलणी करा. मजकूर हटवण्यास त्यांना सांगा अशा सूचना दिल्या आहेत.

विकिपीडिया भारतातून संचालित होत नाही. हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. त्याचे काही नियम आहेत. त्यावर कोण लिखाण करू शकतं याचे संपादकीय अधिकार काही लोकांना असतात. त्यामुळे आपल्याला त्यांना निश्चितपणे सांगता येईल की ऐतिहासिक तथ्य मोडूनतोडून किंवा चुकीच्या पद्धतीने लिहीणे योग्य नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरील हा मजकूर हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात होती. या मजकुराचा आधार केआरकेने आपल्या पोस्टमध्ये घेतला आहे. यावरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यानंतर हा मजकूर हटवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. विकिपीडियाशी संपर्क साधून हा मजकूर हटवण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करा अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
हेही वाचा :
पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांना बसणार धक्का? ‘हा’ माजी खासदार भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर
छळाला कंटाळला ट्रक ड्रायव्हर, RTO ऑफिससमोर दिली जीव देण्याची धमकी; रड रड रडला अन् Video Viral