लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Yojana) राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक आरोप केले जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याकडून करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Yojana) राबवली आहे. तसेच या योजनेला राज्यभरातून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेसंदर्भात काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सर्वात मोठा दावा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद केली आहे. तसेच आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन ही लोकप्रिय योजना बंद केली आहे.

मात्र आता महायुती सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणांना एक पैसा देखील मिळणार नाही. तसेच महायुतीने ही योजना फक्त निवडणुकीसाठी राबवली असल्याचा दावा रमेश चेन्निथला यांनी केला आहे. याशिवाय महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत देखील अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. परंतु त्या निर्णयामधील एकही निर्णय यशस्वी होणार नसल्याच त्यांनी म्हटल आहे.

रमेश चेन्निथला म्हणाले की, महायुती सरकारचे कोणतेही अस्तित्व सध्या राहिले नाही. कारण भाजपने मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवले आहे. याशिवाय भाजप पक्ष आता मित्रपक्षांना संपवण्याचे काम करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच आम्ही शिवसेना उबाठाला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासह इतर छोट्या पक्षांना देखील चांगलं स्थान दिले आहे. त्यामुळे आमची समाजवादी पक्षाशी देखील चर्चा सुरु आहे असं चेन्निथला म्हणले आहेत.

हेही वाचा :

नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार!

शिवसेनेच्या माजी आमदाराची जीभ घसरली; शिवसेना एक सुंदर स्त्री… मात्र लोक आता…Video

दिवाळी पार्टीत कडेकोट बंदोबस्तात पोहोचला बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी