महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; क्रीडा संकुलासाठी क्रिकेटपटू अजिंक्य राहणेला जमीन

मुंबईतील वांद्रे परिसरातील पॉश परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा(sports) संकुल तयार होणार आहे. याकामी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी राज्य सरकारने क्रिकेटपटू अजिंक्य राहाणेला दोन हजार चौरस मीटर जमीन भाडेतत्वार देण्यास मंजुरी दिली आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यानंतर अजिंक्य राहाणेने सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट लिहीत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

याआधी 1988 मध्ये माजी क्रिकेटपटू(sports) सुनील गावसकर यांना हा भूखंड देण्यात आला होता. या जमिनीवर इनडोअर ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा विचार होता. त्यासाठी हा भूखंड देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत अजिंक्यने त्याच्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. याआधी जवळपास 36 वर्षांपूर्वी सुनील गावसकर यांना भूखंड देण्यात आला होता. परंतु, विकासाअभावी सरकारने हा भूखंड माघारी घेतला होता. कॅबिनेट नोटमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर आता येथे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा विचार सुरू आहे.

हा भूखंड राहाणेला भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव म्हाडाकडून मंजूर करण्यात आला होता. यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली. सुनील गावसकर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला मिळालेला हा भूखंड मे 2022 मध्ये सरकारला परत करण्यात आला होता. यानंतर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचे निश्चितच होते.

या कामासाठी आता अजिंक्य राहाणेची निवड करण्यात आली आहे. सरकारने हा भूखंड भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याआधी 2021 मध्ये राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी अकादमीसाठी सुनील गावसकर यांनी काहीच काम केले नाही असा खुलासा केला होता. आता क्रिकेटपटू अजिंक्य राहणे किती कालावधीत क्रीडा संकुल पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा:

‘मेरे मेहबूब’ गाण्यातील स्टेपमुळे तृप्ती डिमरी प्रचंड ट्रोल

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? काय आहे प्रकरण

MS धोनीने पुन्हा जिंकले क्रिकेटप्रेमींचे मन! CSK कडून कमी पगारावर घेतला करार