लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : राज्यामध्ये जोरदार राजकारण (politics)सुरु आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन संपले असून मंत्र्यांना खातेवाटप देखील करण्यात आलेले आहे. महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आठवड्याभरानंतर खाते वाटप करण्यात आले. यानंतर आता कॉंग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या (दि.23) सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी हे उद्या परभणीच्या दौऱ्यावर असणार आहेत. यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे.

परभणी दौ-यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी(politics) हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर नांदेडहून ते गाडीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील व त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी ५.१५ वाजता विमानाने दिल्लीला जातील.

यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, खा. रविंद्र चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली व निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणालाही अटक केली होती त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा ह्लदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेची देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये पूर्ण माहिती दिली होती. मात्र या माहितीवरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी जोरदार आंदोलन केले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.

कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींवरील भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, नाना पटोले म्हणाले की, नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दांचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे. जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करून, गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतं असे मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

सांगलीतून रुपाली चाकणकर यांचा मोठा दावा; म्हणाल्या, आता आमच्या पक्षात…

छगन भुजबळांची रणनीती ठरली? ‘त्या’ बैठकीनंतर घेणार मोठा निर्णय

शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार