बुडणाऱ्या मित्रासाठी पूराच्या पाण्यात घेतली झेप वाहून जाणाऱ्या मित्राला वाचवले
पावसानं गेल्या काही दिवसांत संपूर्ण देशाला पार झोडपून काढलं होतं.(background) मुंबई-पुण्यापासून पार दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी इतका पाऊस पडला की जणू पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये अशा सूचना वारंवार प्रशासनातर्फे दिल्या जात होत्या. मात्र तरी देखील काही अतिउत्साही लोकं कारण नसताना बाहेर पडायचे आणि पूराच्या पाण्यात अडकायचे.असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही गेल्या काही दिवसांत पाहिले असतील. याच पार्श्वभूमीवर आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा नदीतून वाहून होता. तेवढ्यात एका तरुणानं जीवाची बाजी लावून त्या मुलाला नदीतून बाहेर खेचून काढलं. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. (background)हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक मुलगा नदीच्या पाण्यात वाहून जात आहे. पाण्याचा फोर्स जास्त असल्यामुळे त्याला उलट्या दिशेनं पोहता येत नाहिये. तेवढ्यात एक मुलगा पुढे येतो आणि तो एका कपड्याच्या मदतीनं या मुलाला पाण्यातून बाहेर काढतो.
नदीच्या काठांवर काही सिमेंटचे पीलर ठेवले होते. या पीलरवर झोपून तो एक कपडा पाण्यात सोडतो आणि या कपड्याला पकडून तो बुडणारा मुलगा नदीतून बाहेर पडतो. लक्षवेधी बाब म्हणजे या मुलाला बाहेर काढताना जर त्या तरुणाचा तोल गेला असता तरी तो सुद्धा पाण्यातून वाहून गेला असता.
हा व्हिडीओ २३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी जीव वाचवणाऱ्या मुलाचं कौतुक करत (background)आहेत. कारण त्यानं स्वत:चा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या मुलाला वाचवलं. तर कोणी या व्हिडीओला स्क्रिप्टेड म्हणत सोशल मीडियावर केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेलं हे नाटक होतं असा दावा करतोय. असो हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
हेही वाचा :
भरधाव ट्रकने वाहनांना १ किलोमीटर फरफटत नेलं, पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू
इचलकरंजीत पुराचे राजकारण: मदतीऐवजी फोटोसेशन वर भर, नागरिकांमध्ये संताप