येशू ख्रिस्ताच्या जन्माची अद्भुत कहाणी आणि ख्रिसमस सणाचा इतिहास जाणून घ्या…

ख्रिसमस हा सण फक्त एका उत्सवापुरता मर्यादित नाही, तर तो प्रेम, शांतता आणि आनंदाचा संदेश देतो. जगभरातील कोट्यवधी लोकांकडून हा सण 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, क्रिसमस साजरा करण्यामागील मूळ कथा काय आहे? येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित या(festival)सणाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया.

ख्रिसमसचा (festival)थेट संबंध येशू ख्रिस्ताच्या जन्माशी आहे. ख्रिस्ती धर्मानुसार, येशू ख्रिस्त यांचा जन्म सुमारे 2000 वर्षांपूर्वी इस्रायलमधील बेथलेहेम या छोट्या गावात झाला. बायबलमधील उल्लेखानुसार, मरियम (मेरी) यांना देवाचा संदेश आला की, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे मुलगा होणार आहे, ज्याचे नाव येशू असेल. येशू म्हणजे “जगाचा तारणहार” किंवा “ईश्वराचा पुत्र.”

मरियम आणि यूसुफ (जोसेफ) येशूच्या जन्मावेळी बेथलेहेमला गेले होते, कारण त्या वेळी रोमन सम्राट ऑगस्टसने कर जमा करण्यासाठी लोकांना त्याच्या मूळ गावी जाण्यास सांगितले होते. बेथलेहेममध्ये गर्दीमुळे त्यांना कुठेही निवारा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी एका गोठ्यात आश्रय घेतला, आणि तेथेच येशूचा जन्म झाला.

येशूच्या जन्मावेळी आकाशात एक तेजस्वी तारा चमकत होता, जो जगाला या तारणहाराच्या आगमनाची माहिती देत होता. याच ताऱ्याच्या मार्गदर्शनामुळे तीन ज्ञानी राजे (थ्री वाइज मेन) येशूला भेटण्यासाठी आले. त्यांनी येशूला सोने, लोभान, आणि गंधरस ही मौल्यवान भेटवस्तू दिल्या.

येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला की नाही, याबाबत स्पष्ट पुरावे नाहीत. तथापि, चौथ्या शतकात रोमच्या सम्राट कॉन्स्टंटाइन यांनी 25 डिसेंबरला येशूचा जन्मदिन साजरा करण्याचे ठरवले. हा दिवस त्या काळी सूर्य देवतेच्या पूजेचा दिवस म्हणून ओळखला जात असे. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी 25 डिसेंबर हा दिवस ख्रिस्ती सणासाठी निवडण्यात आला.

ख्रिसमस सणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्रिसमस ट्री. या झाडाचा उगम 15व्या शतकात जर्मनीमध्ये झाला, जिथे लोक देवाची पूजा करण्यासाठी झाड सजवत असत. नंतर, ही प्रथा युरोप आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये लोकप्रिय झाली. क्रिसमस ट्री आज आनंद, प्रेम, आणि एकतेचे प्रतीक मानले जाते.

सांता क्लॉज: सांता क्लॉजचा उगम सेंट निकोलस या संताच्या कथेतून झाला आहे. लहान मुलांना गिफ्ट देणाऱ्या सांता क्लॉजची प्रथा जगभरात प्रसिद्ध आहे.
कॅरोल गायन: ख्रिस्ती गाण्यांच्या माध्यमातून येशूच्या जन्माचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

ख्रिसमस हा फक्त आनंदाचा सण नाही, तर तो प्रेम, शांतता, आणि मानवतेचा संदेश देतो. येशू ख्रिस्त यांनी आपल्या आयुष्यात दाखवून दिले की, प्रेम आणि दयाळूपणा यांद्वारे जग चांगले बनवता येते.

ख्रिसमस संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नाताळाच्या दिवशी लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा, नाताळ होईल आणखीन खास

ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती धर्मीयांसाठी नसून, तो प्रत्येकासाठी एक संदेश घेऊन येतो. प्रेम करा, क्षमा करा, आणि एकत्र रहा. येशूच्या जन्माच्या या अद्भुत कथेमुळे आणि या सणाच्या परंपरांमुळे तो जगातील सर्वात प्रिय सणांपैकी एक बनला आहे. त्यामुळे, यंदाच्या ख्रिसमसला या प्रेमाच्या संदेशाचा स्वीकार करून, आपले जीवन उजळवूया.

हेही वाचा :

हप्ता वसुली सुरू असूनही…” शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप”

माजी क्रिकेटरच्या वडिलांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?”

खरी मजा आत्ताच सुरू, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर जोरदार वार