जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना…’; छगन भुजबळांची अजित पवारांबाबतच्या प्रश्नावर संतप्त!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या मित्रपक्षांनी तयारी सुरु केली आहे. पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी(Ajit Pawar) अजित पवार गटाच्या नेत्यांचा शिर्डीमध्ये मेळावा होत आहे.
भाजपच्या नंतर आता राष्ट्रवादी (Ajit Pawar)अजित पवार गटाने देखील पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी ‘नवसंकल्प शिबिर शिर्डीमध्ये सुरु झाले आहे. राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्ये नाराज नेते छगन भुजबळ यांनी देखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी मात्र नाराज नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार का याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते पक्षांमध्ये नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त देखील केली आहे.
छगन भुजबळ हे अजित पवार यांनी संधी न दिल्यामुळे नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ सहभागी होणार की नाही याची चर्चा रंगली होती. छगन भुजबळ सहभागी झाले असून त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला आहे.
छगन भुजबळ यांना माध्यमांशी संवाद साधताना त्यांना शिबिराला येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले की, “नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबीर नाही.
काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या. मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही”, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, राज्यसभेवर जायचं की नाही, असा प्रस्ताव नाही. येवला सोडून मी जाऊ शकत नाही. समता परिषदेचे काम चालू राहिल. माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी भाषण करणार नाही, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
पुढे त्यांना शिबिरासाठी अजित पवार यांनी फोन केला का? असा सवाल करण्यात आला. ते म्हणाले की, जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना”, असे छगन भुजबळ म्हणाले. यामुळे अजित पवारांनी छगन भुजबळ यांना कोणताही संपर्क केलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
सरकारचा मोठा निर्णय: सोयाबीन खरेदीची मुदतवाढ, शेतकऱ्यांना होणार फायदा
महायुतीत ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान!
महाकुंभातील अघोरी बाबांची भविष्यातील भीषण भविष्यवाणी उघड!