विमानाप्रमाणेच आता एसटीमध्येही ‘सुंदरी’; मग तिकीटाच्या दरात होणार का वाढ?
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडून(ST) आता प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहे.
एसटी(ST) महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे एसटीच्या 343 बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले.
अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ. सेमी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही दिली जात आहे.
हेही वाचा :
तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले
विधानसभेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट भाजपला इशारा
आजपासून नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजेची पद्धत