गोव्यात दारूबंदी? भाजपाच्या आमदाराची मागणी म्हणाले, “पर्यटक गोव्यात फक्त मद्यासाठी येत नाहीत”
गोवा हे नाव जरी ओठावर आलं तर अनेकांच्या नजरेसमोर येतो उधाणलेला समुद्र आणि बाटलीतून फेसाळत बाहेर पडणारे मद्य. गोवा म्हणजे मजा, मस्ती आणि मद्य, (alcohol)असे समीकरण गोव्यात जाणाऱ्या प्रत्येकाचे असते. गोव्यात येऊन नुसता धिंगाणा करायचा, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र गोव्यातल्या लोकप्रतिनिधिंना आता असं वाटत नाही.
सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आपापले मुद्दे रेटत असताना भाजपाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मद्यबंदीची मागणी लावून धरली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना प्रेमेंद्र शेट यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली.
ते म्हणाले, “गोव्यामध्ये गेल्या काही वर्षात मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. मद्य सेवनामुळे काही जणांचा मृत्यू ओढवला आहे. हे सर्व थांबविण्यासाठी मी मद्यबंदीची मागणी सरकारकडे केली. गोव्यात पर्यटक केवळ मद्यासाठी येत नाहीत. तर येथील सौंदर्य पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येतात.”
प्रेमेंद्र शेट यांच्या या मागणीमुळे गोवा विधानसभेत चर्चा रंगली आहे. काही लोकप्रतिनिधी या मागणीला समर्थन देत आहेत तर काहींनी ती विरोधात नोंदवली आहे. गोव्यात मद्यबंदी झाल्यास पर्यटनावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
आयएएसमधून पूजा खेडकरांना डच्चू; यूपीएससीची कडक कारवाई,
“अधिक जगण्याची इच्छा नाही” राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची उद्विग्न प्रतिक्रिया
पुष्पा २ चा लीक झालेला व्हिडीओ व्हायरल, चाहते चित्रपटाच्या निर्मात्यांवर संतप्त