लोकसभेचा धुरळा अन् प्रचाराचा ‘शरद पवार’ पॅटर्न भर पावसात गाजवल्या सभा!

२०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती शरद पवार(rain maker) यांच्या साताऱ्यातील सभेची. साताऱ्यात शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या धुवाँधार भाषणाने राजकीय चित्रच उलटून गेले. यंदा शरद पवार यांच्या याच भाषणाचा फंडा महाविकास आघाडीतील नेते वापरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांचा प्रचार पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून काँग्रेस(rain maker) आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून आमदार राम सातपुते यांचे आव्हान आहे. सध्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. काल सोलापुरातील बाळे येथे प्रणिती शिंदेंची कॉर्नर सभा झाली.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा सुरू असतानाच अचानक पावसाला सुरूवात झाली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी पावसाला सुरूवात झाल्यानंतरही धुवाँधार भाषण केले. त्यांच्या या पावसातील भाषणामुळे उपस्थितांनाही शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

परभणी लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून मुख्य लढत महाविकास आघाडीचे संजय जाधव व महायुतीचे महादेव जानकर यांच्यात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचार्थ घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संजय जाधव यांची सभा सुरू होताच अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी संजय जाधव यांनी न थांबता आपलं भाषण सुरू ठेवले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

डीपफेक टेक्निकचा धोका वाढला, इंटरनेट विश्वात वावरताना महिलांनी राहावे सावध

मी त्यांचं कौतुक करतो.. राज ठाकरेंच्या ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान!

‘तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल…’ विराट कोहली कोणाबद्दल म्हणाला असा?