सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी जुलै 2025 महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.(Apply )कारण या महिन्यात SSC, रेल्वे, बँक, शिक्षण, आंगणवाडी, न्यायालय व हवाई दल यासारख्या विविध विभागांत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक भरतींसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही याच महिन्यात आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करणे आवश्यक आहे.जुलै महिन्यात मध्यप्रदेश अंगणवाडी भरतीला सुरुवात झाली आहे. MP मध्ये 19,500+ पदांसाठी भरती सुरू असून 12वी उत्तीर्ण महिला उमेदवार कार्यकर्ती व सहायिका पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख: 4 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख लक्षात घेऊन आजच अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करावी. जुलै २०२५ रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी विशेष आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) कडून 6238 पदांसाठी अर्ज सुरू आहेत. 10वी पास आणि ITI धारक अर्ज करू शकतात. अंतिम तारीख २८ जुलै २०२५ जरी असली तरी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्णत्वास आणणे कधीही उत्तम आहे.
SSC CGL 2025 भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी 14,582 जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. SBI PO भरतीला सुरुवात झाली आहे. SBI मध्ये 541 PO पदांसाठी अर्ज सुरू आहेत. IBPS च्या वेबसाइटवर अर्ज करता येईल. (Apply )अंतिम तारीख14 जुलै निश्चित आली आहे. SSC CHSL भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 12वी पास उमेदवारांसाठी LDC, JSA, DEO या पदांवर भरती सुरू. अंतिम तारीख18 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
SSC MTS व हवालदार भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती खास 10वी पास उमेदवारांसाठी असून या भरतीच्या माध्यमातून 1075 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अंतिम तारीख 24 जुलै निश्चित करण्यात आली आहे. राजस्थान हायकोर्ट चपरासी भरतीदेखील आयोजित करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 5729 पदांवर भरती. अंतिम तारीख 27 जुलै निश्चित करण्यात आली आहे. इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरतीला देखील या जुलै महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. अग्निवीर वायु INTAKE 02/2026 साठी अर्ज 11 जुलैपासून सुरू असून, अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत ठरवण्यात आली आहे.
SSC JE भरतीमध्ये 1340 पदांसाठी जागा रिक्त आहेत. अभियंता शिक्षण असणारे उमेदवार या भरतीमध्ये नियुक्तीसाठी पात्र आहेत. (Apply )अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे. तसेच झारखंड शिक्षक भरतीला सुरुवात झाली असून 1373 शिक्षक पदांसाठी अर्ज सुरू करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा :