नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. यातील अनेक व्हिडिओ(Video) हे हास्यास्पद असतात तर काही आश्चर्याचा धक्का देणारे… सध्या नीतीश कुमार यांच्या कार्मक्रमातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नितीश कुमार कार्यक्रमातून निघताच लोकांनी प्रदर्शनात ठेवलेल्या माशांवर हल्ला केला आणि हे मासे लुटायला सुरुवात केली.

लोकांनी अक्षरशः उडी मारत, एकमेकांसोबत धक्काबुक्की करत हे मासे लुटण्याचा प्रयत्न केला. यानंतर या सर्व घटनेचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर झाल्याच्या काही क्षणातच व्हायरल झाला आहे. आता नक्की काय घडले याविषयी जाणून घेऊयात.

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून मासे लुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमात गेल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यक्रम संपला आणि नितीश कुमार तेथून निघून गेल्यावर तिथे उपस्थित लोकांनी प्रदर्शनात ठेवलेले मासे धक्काबुक्की करत लुटले. यानंतर तेथे प्रचंड गोंधळ उडाला. व्हायरल व्हिडिओमध्ये लोक बायोफ्लॉक टाकीत उडी मारून सर्व मासे लुटताना दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार सहरसा दौऱ्यावर पोहचले, जिथे त्यांनी सर्वप्रथम दिवारीतील माँ विषहरी मंदिराचे उद्घाटन केले आणि प्रार्थना केली. यानंतर ते अमरपूरला पोहोचले, जिथे विविध विभागांनी प्रदर्शनांचे आयोजन केले होते, ज्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

या प्रदर्शनात मत्स्यव्यवसाय विभागातर्फे बायो फ्लॉक लावण्यात आले असून, त्यात अनेक मासे पोहत होते. पाहणीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पटनाला रवाना झाले. ते निघून जाताच तिथे मासे लुटण्यासाठी गोंधळ सुरु झाला. यावेळी अनेकजण मासे लुटण्यासाठी बायो-फ्लॉकच्या आत शिरले आणि पाण्यातून ,मासे बाहेर काढू लागले.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले की, ते नितीश कुमार यांना भेटण्यासाठी नव्हे तर मासे पकडण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितले की, ते हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आणि मासे घेण्यासाठी कार्यक्रमात सामील झाले होते. ही घटना काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी सुबोध कुमार सांगतात की, हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसाठी आयोजित करण्यात आला होता, मात्र यासाठी त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

हेही वाचा:

निवडणुका रद्द होणार आधीच माहिती होतं; अमित ठाकरेंचं विधान!

महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार

निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?