“कमळ, घड्याळ, धनुष्यबाण हे…”; कोल्हापुरातून अमित शहांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना

कोल्हापूर: राज्यात लवकरच विधानसभा(assembly) निवडणूक होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य असलेले अमित शहा हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान कोल्हापूरमधील मेळाव्यात अमित शहा यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करत विधानसभा(assembly) निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मरगळ बाजूला ठेवून निवडणुकीसाठी कामाला लागावे; भाजपा येणाऱ्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असेल. तसेच महायुतीचीच सत्ता महाराष्ट्रात येणार असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह भाजपामध्ये प्रवेश केला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लोकसभापेक्षा विधानसभेला पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

अमित शहा पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगले यश मिळेल अशी आशा होती. मात्र काही चुकांमुळे अपेक्षित असणाऱ्या जागेवर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात नाराजी पसरली आहे; मात्र देशात सलग तीन वेळा भाजपची सत्ता आणून पंतप्रधान पदावर विराजमान होणारे नरेंद्र मोदी हे एकमेव आहेत. राहुल गांधी यांनी भाजपला हरवण्यासाठी संपूर्ण देश पिंजून काढला. मात्र त्यांना तिनही निवडणुकीत अपयश आले हे विसरू नये.

लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाबाबत खोटा प्रचार काँग्रेसने केला. परंतु राहुल गांधी अधिक जागा मिळाल्या असल्याच्या कांगावा करतात. मग देशात सत्ता मिळून आपण का निराश राहायचं असा सवाल कार्यकर्त्यांना करत विधानसभा(assembly) निवडणुकीत रणनीतीचा वापर करत बूथ मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवत काम करावे .त्यामुळे भाजपचे निश्चितच मताधिक्य वाढणार आहे. सहकारी संस्था, महिला बचत गट आदींना जोडण्याचे काम करा, बूथ लेवलवर काम करणारा कार्यकर्ता हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. आपण स्वतः सुद्धा बुथवर राहून काम केले आहे. कमळ, घड्याळ, धनुष्यबाण हे आपले एकच चिन्ह मानून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.

आताची निवडणूक ही एक दिलाने, एक मनाने लढून महाराष्ट्रात सत्ता आणावयाची आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राम मंदिराची उभारणी केली.तलाक बंदी कायद्याची अंमलबजावणी झाली. ३७० कलम आणले. देशाची अर्थव्यवस्था सुधारली, भविष्य काळात ही अर्थ व्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर राहील असेही त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराच्या जाळ्यात अडकल्याने या ठिकाणी काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला बालेकिल्ला समजतात .मात्र या निवडणुकीत भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ओळखला जाईल असे सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणून गोरगरीब महिलांना पाठिंबा देण्याची काम केले आहे. आत्तापर्यंतचे निवडणुका पाहता महिला या प्रामाणिक असतात ज्यांनी आपल्यासाठी केले आहे. त्यांच्या पदरातच मत टाकतात हे आम्हाला आता समजून आले आहे .त्यामुळे महिलांचे मतदान या निवडणुकीत निर्णायक असणार आहे. महायुतीच्या सरकारने राज्यातून दुष्काळ पूर्णतः हटवला आहे. जलयुक्त शिवार योजना राबवली जिल्हा, तालुका, गाव आज संपूर्ण पाणीदार झाले आहे.

तसेच येणाऱ्या काळात महापुराची परिस्थिती सुधारण्यासाठी हे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा प्रयत्न आमचा असून यासाठी चार हजार कोटी रुपयांच मंजुरी दिली आहे. रावसाहेब दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

अजित पवार महायुतीतून बाहेर पडून आमच्यात येतील; बड्या आमदारांचा दावा

ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा कोसळला?, धक्कादायक अहवाल सादर