लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(yojna) सुरु केली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या योजनेला राज्यातील महिलांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? याबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट दिली आहे.

मात्र लाडकी बहीण योजना(yojna) बंद पडणार का? याबाबत राज्य सरकारने खरंच निर्णय घेतलाय का? याबाबत अधिकृत घोषणा झालीये का? तर जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे.

आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, हे पैसे नेमके कधी येणार याची कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाही.

यासंदर्भात अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असे स्पष्ट केले आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील महिलांनी बळी पडू नये, ही नम्र विनंती असेही अदिती तटकरे पुढे म्हणाल्या आहेत. दरम्यान अदिती तटकरेंनी एक मोठे विधान केलं आहे. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा :

अखेर जरांगे पाटलांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ जागांवर देणार उमेदवार

सावधान! व्हॉट्सअप अ‍ॅडमिन सेटिंग बदला; ..अन्यथा आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

शेवटची मॅच खेळला हा भारतीय? NZ कडून पराभवानंतरच्या ‘त्या’ कृतीने चर्चांना उधाण