महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना दोन वर्षांचा कारावास…

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने(court) मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुख्यमंत्री निधीतून कमी उत्पन्न दाखवून घर घेण्याच्या गैरव्यवहारात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

1995 ते 1997 या काळात, सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर मिळवल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर होता. त्यांनी घर नसल्याचे भासवून मुख्यमंत्री निधीतून घर घेतले होते. याशिवाय, इतर दोन लाभार्थ्यांना मिळालेली घरेही स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे न्यायालयाच्या तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले, आणि तब्बल 28 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला.
या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादवी 420 (फसवणूक), 465 (कागदपत्रांची बनावट), 471, 47 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे म्हणाले, “हे प्रकरण 30 वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळी माझे राजकीय प्रतिस्पर्धी तुकाराम दिघोळे यांनी माझ्याविरोधात ही केस दाखल केली. न्यायालयाने निकाल दिला असला, तरी मी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात(court) दाद मागणार आहे.”
कायद्याच्या नियमानुसार, कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांचे आमदारकीचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासह आमदारकीवरही गंडांतर आले आहे. आता ते उच्च न्यायालयात अपील करणार का आणि न्यायालय यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेतील तुमचे 1500 रुपये बंद होणार?
ज्याची भीती होती तेच झालं! युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला?
दहावीतल्या पोरींचा कारनामा, बॉयफ्रेंडच्या नादी लागून केलं असं काही की घरचे हादरले