महाराष्ट्र हादरलं! ४८ तासात ५ खून; ‘या’ भागात घडल्या घटना
पुणे : शांत पुण्यात गेल्या ४८ तासात खूनाच्या तब्बल पाच घटना घडल्या असून, वानवडी, सिंहगड तसेच वाघोली आणि मध्यरात्री कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. वानवडी तसेच सिंहगड परिसरात पुर्ववैमन्यासातून अल्पवयीन मुलांना ठार मारण्यात आले आहे. तर, वाघोलीत दारू पिताना वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाने एका ४६ वर्षीय व्यक्तीचा खून केला आहे. तसेच, कोंढव्यात तीन हजारांच्या व्यवहारातून एकाचा खून(murders) केला गेला आहे. अवघ्या ४८ तासात ५ खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
कोंढवा परिसरात बुधवारी मध्यरात्री तीन हजारांच्या आर्थिक व्यवहारातून ताहिर उर्फ बबलू शेगडीवाला (वय ५९) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास चेत्री (वय ४७) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ताहिर व विकास ओळखीतील आहेत. दोघेही मिळेल ती कामे करतात. दरम्यान, तीन हजार रुपयांवरून त्यांच्यात रात्री पुन्हा वाद झाला होता. वादानंतर रागाच्या भरात डोक्यात दगड घालून ताहिर याचा खून(murders) केला.
चौथ्या खूनाची घटना वाघोली परिसरात घडली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दारूच्या नशेत असताना एकाने तुझा बाप टकल्या आहे असे म्हंटल्यानंतर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने मारहाण केली. नंतर भला मोठा दगड उचलून आधी पाठित आणि नंतर छातीवर टाकून खून केला. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना वाघोलीतील दरेकर वस्तीत घडली आहे.
त्यापुर्वी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नर्हे परिसरात गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून माजी सरपंच व इतरांनी एका १८ वर्षीय तरुणाचा लाडकी बांबूने बेदम मारहाण करून खून केला. सुरूवातीला मारहाणीचा गुन्हा नोंद झाला. नंतर तो तरुण मृत पावल्यानंतर याप्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून या परिसरात मोठी खळबळ देखील माजली होती. प्रकरणच मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला होता. पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर गुन्हा नोंदवून तीन जणांना अटक केली.
वानवडी परिसरात पुर्ववैमन्यासातून १७ वर्षीय मुलगा कॉलेजला जात असताना दोघांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करून भल्यासकाळी खून केल्याची घटना घडली होती. वानवडीतील खूनानंतर मंगळवारी मध्यरात्री सिंहगड रोड परिसरात तिघांनी गणेशोत्सवात झालेल्या वादातून एका १६ वर्षीय मुलाचा सपासप वार करून खून केला होता. गेल्या दोन दिवसात शहरात खुनाचे पाच प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ह्या खूनाचे सत्र गुरूवारी देखील सुरूच असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :
शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही!
‘माझ्या मुलाला सोडा’; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये
इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच