महाराष्ट्र हादरला! ‘या’ जिल्ह्यात 2 सख्ख्या बहिणींवर अत्याचार

जळगाव : राज्यात(district) गेल्या काही दिवसांपासून महिला तसंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनेमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. “राज्यात दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड काढली जात आहे. बंदलापूरमधील एका शाळेत 2 शआळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती, या घटनेने राज्य हादरुन निघालेले असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात 11 आणि 13 वर्षीय दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हुसेन बारेला असे नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव(district) पोलिसांनी अटक केली आहे.

अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली.

त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन असलेल्या दोन सख्ख्या बहिणीवरील अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा पुन्हा हादरला आहे.

हेही वाचा:

कीर्तन कार्यक्रमावरून घरी परतत असतानाच काळाचा घाला, 4 जण जागीच ठार

तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, VIDEO

इंजिनिअरनं एकीकडे नोकरी करत 60 गुंठ्यात रताळ्यातून कमवले 6.5 लाख, सांगलीतल्या तरुणाची होतेय वाहवा!