महाराष्ट्र हादरलं! भररस्त्यात गोळीबार अन् पुढे घडल भयंकर
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं(firing) प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अशातच आता पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. पुणे शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुण्यात गोळीबार(firing) झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. अशातच आता पुण्यात वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाला आहे.
मात्र हा हल्ला पूर्व वैमन्यासातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक चौकशीतून वर्तवला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर रात्री एकच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव दिलीप गायकवाड असे आहे. कोंढव्यातील साळवे गार्डन समोर ही संपूर्ण घटना घडली आहे. यावेळी अज्ञात तरुण गाडीवर येऊन दिलीप गायकवाड यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेतल आहे.
मात्र या घटनेत दिलीप गायकवाड हे जखमी झाले आहेत. तसेच घटनेनंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच यासंदर्भात अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
हेही वाचा:
शनीदेवाच्या कृपादृष्टीमुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत
आदिती राव आणि सिद्धार्थ अडकले एकमेकांच्या बंधनात, ४०० वर्षे जुन्या मंदिरात केले लग्न!
आधी स्पर्श केला…नंतर कपडे काढले… आणखी एका सरकारी रुग्णालयात महिलेचा लैंगिक छळ