“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रसिद्ध गायक(singer) अभिजित भट्टाचार्य यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यूट्यबवरील एका पॉडककास्टमध्ये बोलत असताना अभिजित भट्टाचार्य यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांचा या विधानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

महात्मा गांधी यांच्यापेक्षा पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले आहेत. इतकंच नाही तर, भारत हा देश पहिल्यापासूनच होता. नंतर पाकिस्तान वेगळा झाला. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते, असंही भट्टाचार्य म्हणाले आहेत.

अभिजित भट्टाचार्य (singer)यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. “महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता होते की नाही, हा निर्णय करणारे तुम्ही कोण?”, असं एक नेटकरी म्हणाला.तर, “अशा लोकांकडून कोणत्याही चांगल्या गोष्टींची अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे. खुर्चीवर बसून हे लोक काहीही बोलतात”, असं अन्य एक नेटकरी म्हणाला.

याच व्हिडिओत अभिजित भट्टाचार्य यांनी अभिनेता सलमान खानबद्दल देखील भाष्य केलंय. “सलमान खान अजूनही त्या लेवलचा नाही की मी त्याच्यावर काही चर्चा करेल”, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले. त्यांच्या या व्हिडिओमुळे आता नेटकरी देखील संतापले आहेत.

याच व्हिडिओत ‘ संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का?’ असा प्रश्न देखील अभिजित भट्टाचार्य यांना करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी दिलं.

हेही वाचा :

तर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार….? 

मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं…

मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न