विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला…

महाविकास आघाडीच्या (मविआ) आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (election)मुंबईतील जागावाटपाबाबत मोठा निर्णय घेतला गेला आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या बैठकात मुंबईतील जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीला महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक 20 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 13 ते 15 जागा तर शरद पवार गटाला 5 ते 7 जागा देण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी गटाने ठाकरे गटाला अधिक जागा देण्यावर सहमती दर्शवली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुंबईत चांगले यश मिळवले होते. ठाकरे गटाने मुंबईतील 6 पैकी 3 जागांवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे, विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल. त्यामुळे मुंबईतील जास्त जागा मिळवून ठाकरे गटाला शहरातील प्रभाव वाढवण्याची संधी मिळू शकते.

आजच्या बैठकीत मुंबईसाठीचा हा फॉर्म्युला सर्वानुमते मान्य होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुंबईतील जागावाटप ठरल्यावरच मविआच्या इतर राज्यातील भागांमधील जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होईल.

हेही वाचा:

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार: 30 मृत्यू, दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस

सलमान खानचा व्हिडीओ पाहून चाहत्यांची चिंता; सोफ्यावरून उठताना त्रास अनुभवला

पश्चिम बंगालमध्ये बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा – ममता बॅनर्जीची विधेयक सुधारणा प्रस्तावित