UNSC आणि WTO मध्ये मोठ्या सुधारणा गरजेच्या; BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं स्पष्ट मत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद , जागतिक व्यापार संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था(donation) आता कालबाह्य झाल्या आहेत आणि त्यात मूलभूत सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.ब्राझीलमध्ये झालेल्या १७व्या BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर ठाम भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद , जागतिक व्यापार संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यात मूलभूत सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. विकसनशील देशांचा आवाज या संस्थांमध्ये योग्यप्रकारे पोहोचत नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींनी BRICS देशांच्या विस्तारीकरणाचे स्वागत करत म्हणाले की, इंडोनेशियासारखा(donation) देश जेव्हा या संघटनेत सामील होतो, तेव्हा हे सिद्ध होते की BRICS ही केवळ चर्चा करणारी संस्था नाही, तर काळाच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल घडवणारी आणि नव्या मित्रांचा स्वीकार करणारी संघटना आहे. त्यांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले आणि BRICSच्या यशस्वी आयोजनाबद्दल ब्राझीलचे अध्यक्ष लूला यांचं विशेष कौतुकही केलं.

“ग्लोबल साऊथला निर्णय प्रक्रियेत स्थान नसेल, तर जागतिक संस्था म्हणजे सिम असलेला फोन, पण त्याला नेटवर्कच नसल्याचं त्यांनी म्हटलं. २०व्या शतकात स्थापन झालेल्या संस्था २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञान, आव्हाने आणि गरजांना प्रतिसाद देण्यास असमर्थ ठरत असल्याचंही ते म्हणाले.

AI आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगातही काही जागतिक संस्थांमध्ये गेल्या ८० वर्षांत एकदाही सुधारणा झालेली (donation)नाही. २०व्या शतकातील टायपरायटरने २१व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवण्याचा प्रयत्न करता येत नाही,. ग्लोबल साऊथमधील देशांना केवळ भाषणांमध्ये नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत प्रभावी सहभाग मिळाला पाहिजे, असा आग्रह मोदींनी धरला. त्यांनी असेही नमूद केले की, आजच्या जागतिक संस्था ना संघर्ष थांबवू शकतात, ना महामारी रोखू शकतात, ना सायबर आणि अवकाशातील धोके हाताळू शकतात. त्यामुळे, केवळ चर्चा न करता निर्णय प्रक्रियेत आमूलाग्र बदल गरजेचं आहे. भारत नेहमीच स्वार्थापेक्षा मानवतेच्या भल्यासाठी काम करत आला आहे. “आम्ही सर्व भागीदारांसोबत कार्य करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या परिषदेतून पंतप्रधान मोदींनी जागतिक व्यासपीठावर केवळ भारताचेच नव्हे, तर सर्व विकासशील देशांचे प्रतिनिधित्व केलं. BRICS चा विस्तार, नव्या देशांचा समावेश यामुळे या ब्रिक्सचं महत्त्व जागतिक पातळीवर आणखी वाढत आहे.

हेही वाचा :