मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला बॉम्बने(Bomb) उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. त्या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब हल्ला केला जाईल.

या मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि शैवक्कू शंकर यांना “अन्याय्य फाशी” देण्याचा उल्लेख करून धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मेल पाठवणाऱ्या आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेल उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व एजन्सींना सतर्क करण्यात आले. धमकीच्या ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरुचे नाव नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ पोलिसांना ईमेल केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला पाईप बॉम्बची(Bomb) धमकी देण्यात आली आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरुला आणि सावक्कू शंकर यांचे नाव ईमेलमध्ये नमूद केले आहे. या धमकीच्या ईमेलनंतर सर्व एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट(Bomb) होणार असल्याचा ईमेलही १३ मे रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाला होता. त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याची सत्यता तपासण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व यंत्रणा सतर्क आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आस्थापने, संवेदनशील ठिकाणे आणि धार्मिक स्थळे, परराष्ट्र कार्यालये आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब निकामी आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरीवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला. यावेळी रेल्वे स्थानकांवरील पूल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी करण्यात आली.

लांबपल्ल्यांच्या वाहनांची विशेष सुरक्षा तपासणी करण्यात आली. यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी फटाके वाजवण्याचे आणि नवीन रॉकेट सोडण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत आणि ११ ते ९ जूनपर्यंत बंद आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १० च्या कलम २ अंतर्गत मिळालेल्या अधिकाराखाली उपायुक्तांनी जारी केलेल्या आदेशाची माहिती पोलिसांनी दिली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे सर्व पोलिसांना कळवण्यात आले आहे.

हेही वाचा :

राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

तरुणाला लाठ्याकाठ्या अन् बेल्टने बेदम मारहाण; व्हिडिओही व्हायरल

‘या’ दोन देशांमुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण; सोने 85 हजारांपर्यंत घसरणार का?