वट सावित्रीच्या व्रताला बनवा हेल्दी अन् टेस्टी डोसा उपवासही घडेल अन् पोटही भरेल
पतीला दिर्घायुष्य लाभावे म्हणून सुहासीनी स्त्रीया वडाच्या झाडाची(tree) पूजा करतात. वट पौर्णिमा सणाला विशेष महत्त्व आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच महिला व्रत करतात. या व्रताने पतीला दिर्घायुष्य लाभते अशी भावना त्यामागे असते. पण यासाठी त्या स्वत: च्या आरोग्याची काळजी मात्र घ्यायला विसरतात.
वडाच्या झाडाची पूजा करून हलके काहीतरी खाण्यापेक्षा डोसा खाल्लात तर पोट भरेल. डोसा इडलीचे बॅटर तांदळापासून बनवले जाते. पण डाळ-तांदूळ उपवासाला चालत नाही. यामुळेच आपण उपवासाचे काही पदार्थ वापरून डोसा आणि चटणी कशी बनवायची हे पाहुयात.
साहीत्य
३ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, तेल किंवा तूप, मीठ
कृती
आदल्या रात्री वरीचे तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घाला. सकाळी मिक्सरवर बारीक वाटून झाकून ठेवावे. डोसे करण्याआधी मीठ घालून पीठ डोश्याला लागेल इतपत पातळ करावे.
नॉनस्टीक तव्यावर पाणी शिपडून पळी किंवा वाटीने डोसे घालून पसरून पातळ डोसे करावे. सर्व बाजूंनी तूप सोडावे आणि गुंडाळी करून डोसा काढावा. (Vat Purnima 2024)
या डोश्यासोबत खोबरे मिरची, कोथंबिरीची चटणी करावी. यासोबत बटाटे उकडून त्याची साधी भाजी देखील तुम्ही करू शकता.
हेही वाचा :
मराठा आरक्षणाचे भवितव्य टांगणीला? १० टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल का?
आंतरराष्ट्रीय योग दिन, योग म्हणजे ईश्वराशी एकरूपता.
व्ह्यूज-लाईक्स वाढावण्यासाठी काहीही करू नका;अथर्व सुदामेचा सल्ला…