लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप आवडतो.(sugar) वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणी केक आणला जातो. बाजारात अनेक वेग्वेगळ्या फ्लेवर्सचे, ब्रेडचे केक उपलब्ध आहेत. संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीरात पित्त किंवा ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात घाईगडबडीच्या वेळी तुम्हाला जर झटपट कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही पॅनकेक किंवा मिनी केक बनवू शकता. लहान मुलांना डब्यासाठी तुम्ही हनी केक बनवू शकता. बऱ्याचदा घरी केक बनवताना केक कुकरमध्ये शिजवला जातो. मात्र मिनी केक तुम्ही आप्पे बनवण्याच्या भांड्यात सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मिनी हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
दूध
पिठीसाखर
तेल
बेकिंग सोडा
बेकिंग पावडर
व्हॅनिला इसेन्स
मैदा
साखर
मध
जाम
डेसिकेटेड कोकनट
गरिबांच्या स्वयंपाकघरातून महागड्या रेस्टॉरंट्सच्या (sugar)मेन्यूपर्यंतचा प्रवास; फार रंजक आहे Minestrone Soup चा इतिहास
कृती:
हनी केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दूध, दूधाचा पावडर, पिठी साखर आणि तेल घेऊन मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. मैद्याच्या पिठात अजिबात गुठळ्या अजिबात ठेवू नका.
केक बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करून त्यात बटर गरम करून मैद्याचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने अप्पे भाजून घ्या.
टोपात पाणी गरम करून त्यात साखरआणि मध घालून मिक्स करा.(sugar) तयार केलेले मिनी केक सिरपमध्ये घाला.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हनी केक. हा केक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल.
हनी केक सर्व्ह करताना त्यावर डेसिकेटेड कोकोनट आणि जॅम घालून सर्व्ह करा.
हेही वाचा :
- ‘लाडकी बहीण’ योजनेचे भवितव्य अंधारात? महायुतीतूनच केला जातोय तीव्र विरोध
- श्रध्दा अकॅडमीहोस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचीआत्महत्या-हि आत्महत्या नसूनहत्या नातेवाईकांचा अकॅडमीवरआरोप
- ठाकरे गटाला मोठा धक्का! चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
- लिव्हर कॅन्सर सर्जरीनंतर दीपिकाची अशी अवस्था; मानेवरच्या खुणा पाहून नेटकरी चिंते
- UPI च्या नियमांत मोठा बदल; आता फक्त १० सेकंदात करता येणार पेमेंट