ओट्स-सोया टिक्की बनवणे सोपे असून (breakfast)चवदार देखील आहे. घरातील लहान मुले देखील आवडीने टिक्की खातील, चला तर मग जाणून घेऊया ओट्स-सोया टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

ओट्स-सोया टिक्की (breakfast)बनवण्यासाठी लागणारे साहित्य
सोया
ओट्स
कांदा
आल-लसून पेस्ट
हिरवी मिरची
लाल तिखट
कोथिंबीर
हळद
गरम मसाला पावडर
मीठ
तेल
ओट्स-सोया टिक्की बनवण्याची कृती
ओट्स सोया टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी सोयाबीनच्या (breakfast)वड्या वाफवून घ्या. मिक्सरमध्ये चांगले बारिक करून घ्यावे. नंतर ओट्स मिक्सरमध्ये चांगले बारिक करून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर, लाल तिखट, बारिक चिरलेला कांदा, मीठ,गरम मसाला पावडर,हळद, आलं लसून पेस्ट टाका आणि चांगले मिसळा. नंतर एका कढईत तेल गरम करा आणि हाताला तेल लावून टिक्की तयार करा आणि डिप फ्राय करा. हिरव्या चटणी सोबत गरमा गरमा ओट्स सोया टिक्कीचा आस्वाद घेऊ शकता.
हेही वाचा :
‘एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा’; केंद्राचा राज्यांना इशारा
‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?
कोल्हापूर : ‘ती’ गाडी आली अन् 10 वर्षांच्या मुलाला घेऊन गेली; पण ग्रामस्थांनी पाठलाग केला नंतर…