सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा

सकाळी धावपळीच्या वेळेत काय नाश्ता(dosa near me) बनवावा असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. सुट्टीच्या दिवशी अनेक व्यक्ती काहीतरी चमचमीत आणि टेस्टी खाणे पसंत करतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी झटपट तयार होणाऱ्या बीटरूट डोसाची रेसिपी आणली आहे.

साहित्य

डोसा बॅटर

2 कप तांदूळ

1 कप उडीद डाळ

तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवा आणि आदल्या दिवशी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर रात्री सर्व मिश्रण(dosa near me) मिक्सरला बारीक वाटून घ्या. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्या. रात्रभर हे मिश्रण फरमेट होतं. त्यामुळे मोठ्या भांड्यात मिश्रण ठेवा.

बीट

तिखट

मीठ

बीट कुकरला शिजवून घ्या. त्यानंतर सकाळी मिश्रण चांगलं आंबलेलं असेल. त्यात आवश्यकतेनुसार मीठ, तिखट आणि बीट किसून टाका. तुम्हाला किसलेलं बीट आवडत नसेल तर बीट मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर याचा रस एका गाळणीने गाळून मिश्रणात मिक्स करा.

बीट टाकल्याने डोसाची चव बदलते. त्यामुळे यात आवडीनुसार तिखट आणि मीठ टाकावे. तिखट मध्ये तुम्ही मिरची देखील बारीक चिरून टाकू शकता. मिरची किंवा मसाला टाकने हे ऑप्शनल आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मिक्स करावे. डोसे बनवताना सुरुवातीला ते तुटतात किंवा नीट होत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. यासाठी देखील आम्ही काही हॅक शोधले आहेत.

जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर डोसाच्या तव्यावर आधी एक ऑमलेट बनवून घ्या. त्यानंतर यावर डोसे बनवण्यास सुरुवात करा. दुसरा एक पर्याय म्हणजे एक मोठा कांदा घ्या. तो आडवा मधोमध चिरा. चिरलेला कांद्याच्या एका बाजूला काठी लावा आणि तेलात कांदा बुडवून तव्यावर फिरवून घ्या. त्यानंतर डोसा बनवा. 2 ते 3 डोसे बनवल्यावर हा कांदा फिरवत राहा.

असा सिंपल आणि झटपट डोसा बनवल्यास घरात सर्वांना आवडेल. विशेष म्हणजे यात मीठ आणि मिरची असल्यास अन्य कोणत्या चटणीची देखील गरज नसते. तसेच याचा रंग बीटामुळे लाल झालेला असतो. त्यामुळे लहान मुलं काहीतरी नवीन म्हणून हा नाश्ता आवडीने खातात.

हेही वाचा :

आज मोहिनी एकादशीला ‘या’ राशींची होणार लखलखाट

न्यायाधीशांसमोर आरोपीला खरंच कायदेशीर वागणूक मिळते का?

गोव्यातील कंपनीकडून अक्कलकोटच्या ठेवीदारांना गंडा