सकाळच्या (breakfast )घाईगडबडीमध्ये नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अनेक घरांमध्ये सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली हेच पदार्थ नेहमीच बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे.
कारण सकाळी पोटभर नाश्ता(breakfast ) केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात चिजी एग टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया चिजी एग टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
- ब्रेड
- अंड
- चीज
- दूध
- बटर
- काळीमिरी पावडर
- मीठ
- कोथिंबीर
कृती:
- चिजी एग टोस्ट बनवण्यासाठी, सर्वप्रथम वाटीमध्ये अंड घेऊन फेटून घ्या. त्यानंतर त्यात दूध, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्या.
- तयार केलेल्या ब्रेड स्लाईसवर बटर लावा. पॅन गरम करून त्यावर बटर लावून घेतलेला ब्रेड दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या.
- त्यानंतर तव्यावर पुन्हा एकदा बटर घालून तयार केलेले अंड्याचे मिश्रण पसरवून घ्या. नंतर त्यावर किसलेले चीज घालून पसरवून घ्या.
- ब्रेडच्या स्लाइसवर तयार केलेले अंड ठेवून पुन्हा एकदा दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून व्यवस्थित भाजून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिजी एग टोस्ट. हा टोस्ट तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.
हेही वाचा :