चहा म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत अनेकांना चहा लागतो. काहींची सकाळ चहा पिऊन होते तर काहींना रात्री झोपताना सुद्धा चहा पिण्याची सवय असते. दिवसभर काम करून थकून आल्यानंतर सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर चहासोबत बिस्कीट(Honey Butter Bread) किंवा इतर पदार्थ खाल्ले जातात.

मात्र सतत बिस्कीट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नेहमीच विकत मिळणारे तेलकट तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या वाढण्याची शक्यता असते.
अशावेळी तुम्ही हनी बटर ब्रेड(Honey Butter Bread) हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. याशिवाय चवीला सुद्धा सुंदर लागतो. कमीत कमी वेळात घाईगडबईमध्ये कोणता पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही हनी बटर ब्रेड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया हनी बटर ब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
- ब्रेड
- बटर
- लोणी
- मध
- साखर
कृती:
- हनी बटर ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, बेकरीमध्ये तयार केलेला ब्रेड विकत आणून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
- कापून घेतलेल्या तुकड्यांच्या मध्यभागी पुन्हा एकदा कापून घ्या. ब्रेड कापताना त्याचे दोन तुकडे करू नये.
- त्यानंतर वाटीमध्ये बटर घेऊन त्यात साखर किंवा ब्राऊन शुगर घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात मध घाला.
- मध घालून मिक्स केल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. यामुळे साखर पूर्णपणे वितळेल.
- तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण ब्रेडवर लावून घ्या. याशिवाय ब्रेडच्या आतील भागात लोणी भारा.
- पॅन गरम करून त्यात तयार करून घेतलेले ब्रेड ठेवून व्यवस्थित टोस्ट करा. ब्रेडच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हनी बटर ब्रेड. हा ब्रेड चहामध्ये बुडवून खाल्ल्यास अतिशय सुंदर आणि चवदार लागेल.
हेही वाचा :
धावत्या ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग; अचानक…
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; ‘या’ दिवशी होणार घोषणा
‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा