वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप

आजकालच्या व्यस्त लाइफस्टाइलमध्ये अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रासले आहेत. अशात बरेचजण आपले वजन करू पाहतात. योग्य आहार आणि व्यायामाने हे करणे शक्य होईल. असे अनेक हेल्दी फूड ऑप्शन्स आहेत ज्यांचे सेवन करून तुम्ही झटपट आपले वजन(weight) कमी करू शकता. असाच एक पदार्थ म्हणजे सूप. सुप तर तुम्ही अनेकदा प्यायला असाल मात्र आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा चविष्ट आणि पौष्टीक सूप घरी कसा तयार करायचा याची रेसिपी सांगणार आहोत.

वजन(weight) कमी करण्यासाठी, पौष्टिक आणि कमी कॅलरी आहाराचे पालन करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, मसूर सूप वजन कमी करणे हा एक आरोग्यदायी आणि चवदार पर्याय आहे. मसूर डाळीचे सेवन आपल्या आरोग्यसाठी फार फायद्याचे ठरत असते, यात अनेक पोषक घटक आढळले जातात जे शरीराचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात शिवाय याच्या नियमित सेवनाने शरीरातील अतिरिक्त वजनही कमी होते.

मसूर डाळीत भरपूर प्रमाणात प्रथिनर आणि फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरतात. तुम्हाला याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट असा सूप बनवू शकता. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

-मसूर डाळ- 1 वाटी
-कांदा – 1 बारीक चिरून
-लसूण – 5 लवंगा
-आले – 1 इंच किसलेले
-टोमॅटो- 1 बारीक चिरून
-हल्दी पावडर – 1/2 टीस्पून
-काळी मिरी पावडर – 1/2 टीस्पून
-मीठ – चवीनुसार
-लिंबाचा रस – 1 टीस्पून
-पाणी – 3 कप
-कोथिंबीर – गार्निशसाठी

कृती

-यासाठी सर्वप्रथम, मसूर धुवा आणि 20 मिनिटे भिजवून ठेवा
-यानंतर कुकरमध्ये तेल गरम करा आणि मग त्यात लसूण, आले आणि कांदा सोबत जिरे आणि हिंग हलके परतून घ्या
-आता यात टोमॅटो, हळद आणि मसूर घालून चांगले परतून घ्या
-सर्व साहित्य नीट शिजले की मग यात पाणी आणि मसूर डाळ उकळून पूर्ण शिजू द्या
-शिजल्यावर हलके मिक्स करून त्यात लिंबाचा रस घाला
-शेवटी याला कोथिंबिरीने सजवा आणि तयार मसूर सूप पिण्यासाठी सर्व्ह करा
-तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले देखील घालू शकता

हेही वाचा :

आठवड्याच्या शेवटी सोन्या – चांदीच्या किंमतीत घसरण!

तुमच्या मुलीला लग्नात चुकूनही ‘या’ भेटवस्तू देऊ नये, अन्यथा..

30 वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे दिसले एकत्र