संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मऊसूत पनीर-बटाटा डोनट, लहान मुलं होतील खुश

संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हाकली भूक लागू लागते. संध्याकाळच प्रसन्न वातावरण आणि त्यात गरमा गरम स्नॅक्स या मिश्रणाला काही तोड नाही. अनेकांना संध्याकाळी चहासोबत काही नाश्ता करण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल किंवा तुम्ही एका चविष्ट युनिक अशा रेसिपीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके पण रुचकर अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी(donuts) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे. आपण स्टेप बाय स्टेप या रेसिपीला जाणून घेणार आहोत.

डोनट(donuts) हा पदार्थ तुम्ही अनेकदा खाल्ला किंवा ऐकला असेल. हा एक पाश्चात्य खाद्यपदार्थ आहे. लहान मुलांना किंवा तरुणांना तर हा पदार्थ भारीच आवडतो. आज आपण याच डोनटची रेसिपी जाणून घेणार आहोत मात्र एका अनोख्या अंदाजात! साधारणपणे हा पदार्थ मैद्यापासून तयार केला जातो ज्याच्या आत किंवा बाहेर चॉकलेची लेअर असते.

मात्र आज आम्ही तुम्हाला पनीर-बटाटा डोनट घरी कसा तयार करायचा याची युनिक रेसिपी सांगत आहोत. यात मैदा नसल्याकारणाने हा पदार्थ तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचा ठरेल. या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना टेस्टी पण पौष्टिक असा पदार्थ खाऊ घालू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • तीन ते चार उकडलेले बटाटे
  • एक कप किसलेला पनीर
  • 1/4 मक्याचे पीठ
  • एक चमचा ओरेगॅनो
  • एक चमचा चिली फ्लेक्स
  • स्लरीसाठी (2-3 चमचे मैदा + 1/4कप पाणी)
  • कोटिंगसाठी ब्रेड क्रंब्स
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती

  • पनीर-बटाटा डोनट तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून, सोलून आणि मॅश करून घ्या
  • यानंतर हे मॅश केलेले बटाटे एका भांड्यात काढा आणि यात किसलेले पनीर, कॉर्न फ्लोअर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घाला
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा आणि याचे एक छान पीठ मळून घ्या
  • आता तयार पिठातील काही मिश्रण हातात घ्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला डोनटचा आकार द्या
  • सर्व डोनट्स तयार करून झाले की गॅसवर तेल तापत ठेवा
  • दुसरीकडे डोनट्स स्लरीमध्ये बुडवून, त्यांना ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्या
  • आता तेल तापले की मध्यम आचेवर हे डोनट्स छान क्रिस्पी आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे पनीर-बटाट्याचे डोनट्स तयार होतील
  • तयार डोनट्स सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

हेही वाचा :

प्रियंका चोप्रा 2025 मध्ये चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

लखनऊच्या नववधूने लग्नात घातली ‘बनारसी बिकनी’? Viral Photo

‘मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली…’ हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य