सकाळच्या नाश्त्यात बनवा कुळीथाच्या पीठापासून व्हेजिटेबल थालीपीठ
काळच्या नाश्त्यामध्ये(breakfast) पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कुळीथाच्या पीठापासून तुम्ही व्हेजिटेबल थालीपीठ बनवू शकता. कुळीथाचे पीठ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. अशक्तपणा किंवा थकवा आल्यानंतर तुम्ही कुळीथाच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. यामुळे शरीरात निर्माण झालेला अशक्तपणा कमी होऊन आराम मिळेल.
लहान मुलं काहीवेळा भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, त्यामुळे मुलांना तुम्ही भाज्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवून खायला(breakfast)देऊ शकता. कुळीथमध्ये पोटॅशियम, प्रोटीन आणि इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात सुद्धा तुम्ही कुळीथाच्या पिठाचे आहारात सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया कुळीथाच्या पिठापासून बनवलेले व्हेजिटेबल थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य:
- कुळीथ पीठ
- तांदळाचे पीठ
- लाल तिखट
- मीठ
- तेल
- गरम मसाला
- कोबी,गाजर आणि कांद्याची पात
- आलं लसूण पेस्ट
- कांदा
- कोथिंबीर
कृती:
- कुळीथाच्या पिठापासून व्हेजिटेबल थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम भाज्या स्वच्छ करून बारीक चिरून घ्या.
- मोठ्या बाऊलमध्ये कुळीथ पीठ, तांदळाचे पीठ आणि मीठ टाकून मिक्स करून घ्या.
- नंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून नंतर वरून कांदा टाकून मिक्स करा.
- तयार मिश्रणात लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,कोथिंबीर टाकून मिक्स करा.
- थालीपीठ बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या पिठाच्या छोटे छोटे गोळे करून रुमालावर पाणी घेऊन थालीपीठ बनवून घ्या.
- तवा गरम झाल्यानंतर तेल टाकून थालीपीठ टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
- तयार आहे कुळीथाच्या पिठापासून बनवलेले व्हेजिटेबल थालीपीठ.
हेही वाचा :
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; ‘या’ 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू
33 वर्षांच्या केस खाण्याच्या सवयीमुळे पोटातून काढला 1.5 किलो केसांचा गोळा!
Viral Video: ट्रेनच्या खिडकीतून प्रवाशांना चढवण्याचा धाडसी प्रयोग; पुढे जे घडलं ते पाहून थक्क व्हाल!