१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा व्हेजिटेबल उपमा

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पडणारा प्रश्न म्हणजे सकाळच्या नाश्त्यात काय खावं. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केला की संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करूनच बाहेर जावे. अनेकदा घरी नाश्त्यात सकाळच्या वेळी पोहे, उपमा(vegetable) किंवा शिरा, इडली, डोसा हे पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.

अशावेळी तुम्ही भाज्यांचा वापर करून उपमा बनवू शकता. उपमा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही, अशावेळी तुम्ही मुलांना या पद्धतीने भाज्या खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया व्हेजिटेबल(vegetable) उपमा बनवण्याची सोपी रेसिपी. कमीत कमी वेळात झटपट तयार होणारा पदार्थ.

साहित्य:

  • रवा
  • कांदा
  • टोमॅटो
  • मीठ
  • तेल
  • गाजर
  • हिरवे वाटणे
  • कढीपत्ता
  • उडीद डाळ
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर

कृती:

  • व्हेजिटेबल उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आवडीच्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बारीक चिरून घ्या.
  • उपमा बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात रवा भाजून घ्या.
  • त्याच कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून भाजून घ्या.
  • नंतर त्यात उडीद डाळ टाकून मिनिटं भाजा. भाजलेल्या डाळीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करा.
  • कांदा लवकर भाजण्यासाठी तुम्ही त्यात चवीनुसार मीठ टाकू शकता. मीठामुळे कांदा लवकर भाजला जातो.
  • कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात सर्व भाज्या टाकून २ मिनिटं व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकून पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवा.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात रवा टाकून मिक्स करा. नंतर उपमा शिजण्यासाठी ठेवा.
  • सगळ्यात शेवटी वरून कोथिंबीर टाकून व्हेजिटेबल उपमा सर्व्ह करा. हा उपमा तुम्ही लहान मुलांना डब्यात नाश्त्यासाठी देऊ शकता.

हेही वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज!

दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला सोडणार? इन्स्टा स्टोरीने चाहत्यांमध्ये निर्माण केली उत्सुकता!

सलमान खानला 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या व्यक्तीची माफी; “चूक झाली, माफ करा” अशी विनंती