एक रुपयांच्या नाण्याने व्यक्तीने सजवली कार लोक म्हणतायेत चिल्लर कार Video Viral

सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक दृश्ये लक्ष वेधून घेतात. हे पाहून कुणाचाही (unique)डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही असे हे अनोखे व्हिडिओचा नक्कीच पाहिले असतील. जर नाही तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला ते पाहण्याची संधी मिळत आहे. इंटरनेटवर पुन्हा एकदा एका अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुम्ही कार लव्हर्स असाल तर जरा जपून कारण हा व्हिडिओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.

आपल्या आनंदासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. याचे पोचपावती आपल्याला अनेक व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळते. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो लोकांना थक्कच नाही करत आहे तर यातील दृश्ये आता अनेकांचे होश उडवत आहेत. आजकाल लोक आपल्या आवडीनुसार गोष्टी मॉडिफाय करू पाहतात. यात काही कार लव्हर्स देखील आहेत जे आपल्या कारचा रंग किंवा यातील काही (unique)पार्टस मॉडिफाय करून याला नवीन लूक देऊ पाहतात. आताच्या व्हायरल व्हिडिओतही व्यक्तीने असेच काहीसे करू पाहिले पण त्याचा हा पराक्रम आता सोशल मीडियावर हास्याचे एक कारण बनले आहे.

लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एका व्यक्तीने आपली संपूर्ण कार नाण्यांनी सजवली आहे, ज्यामुळे कार पूर्णपणे नाण्यांनी झाकलेली दिसून येते. यामध्ये आपण पाहू शकतो की, एका व्यक्तीने आपल्या गाडीवर सर्वत्र नाणे कसे चिकटवले आहे. यात काही एक रुपयांचे नाणे आहेत तर काही दोन रुपयांचे. बोनेटपासून ट्रंकपर्यंत त्याने सर्व ठिकाणे हे नाणे चिपकवलेले आहेत. नाण्यांनी भरलेली ही कार सोशल (unique)मीडियावर आता आकर्षणाचा बिंदू बनली. व्यक्तीने बॉनेटपासून ट्रंकपर्यंत सर्वत्र नाणी इतक्या सुबकपणे चिकटवली की ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

नाण्यांनी सजलेल्याया कारचा व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आता कमेंट्स करत व्यक्तीच्या या अनोख्या जुगाडावर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “चिल्लर कार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”लहान मुलांना यापासून दूर ठेवावे नाहीतर एकही नाणे शिल्लक राहणार नाही”.

हेही वाचा :

‘फक्त दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा’… ; संजय राऊत यांचा घणाघात

रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर: 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट त्यासोबत…

चिकन खाणाऱ्यांनो सावधान! डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती