आईची हत्या करून अवयव शिजवून खाणारा नराधम; उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

आईची(mother) हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचे विकृत कृत्य करणाऱ्या एका तरुणाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, जी मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे. २०१७ मध्ये कोल्हापुरात ही धक्कादायक घटना घडली होती. यल्लमा रामा कुचकोरवी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर सुनील कुचकोरवी असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

२८ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापुरात ही हृदयद्रावक घटना घडली. कोल्हापूर सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये सुनील कुचकोरवीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली. ‘आरोपीची तुलना कसायाशीही करता येऊ शकणार नाही, हे नरभक्षणाचे प्रकरण आहे’, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
यल्लम्मा या कंगवा, पिना विकून घर चालवत होत्या. त्यांचा मुलगा सुनील हा काहीच कामधंदा करत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. मुलाची दारू सुटावी म्हणून यल्लम्मा त्याला सतत ओरडत असत, मात्र त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. २८ ऑगस्टच्या दिवशी सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, आईने(mother) पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
भांडणादरम्यान सुनीलने जन्मदाती आईचा धारदार चाकूने खून केला. इतकेच नव्हे, तर त्याने आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला. नंतर आईची किडनी, लिव्हर आणि इतर अवयव बाजूला केले. त्यानंतर ते अवयव शिजवून खाल्ले.
शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्का बसला. आरोपी सुनील तेव्हा आईचे काळीज काढून शिजवून खाण्याच्या बेतात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
हेही वाचा :
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू
अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती? शास्त्रज्ञांनी सांगितली शास्त्रशुद्ध पद्धत
Champions Trophy 2025 च्या सुरक्षेची ‘ऐशी की तैशी’ उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस