मोबाईलमुळे मोडलं लग्न! नवरीचे ‘इंस्टाग्राम रिल्स’ पाहून नवरदेवाने घेतला मोठा निर्णय

मोबाईलने(mobile) आपले दैनंदिन जीवन व्यापले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. याचाच फटका एका होणाऱ्या संसाराला बसला आहे. लग्न ठरल्यानंतरही इन्स्टाग्रामवर रिल्स टाकणे एका नवरीला महागात पडले आहे. होणाऱ्या पतीने हे रिल्स पाहून लग्नास नकार दिला आणि काडीमोड घेतला. त्यामुळे, सोशल मीडियाचा अतिवापर वैयक्तिक आयुष्यात किती महागात पडू शकतो, हे या घटनेतून दिसून येते.

उत्तर प्रदेशातील शहाजहापूर येथील एका तरुणीचा विवाह 16 फेब्रुवारीला उन्नाव जिल्ह्यातील एका तरुणासोबत होणार होता. साखरपुड्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल(mobile) क्रमांक घेतले. मात्र, होणाऱ्या नवऱ्याने तिचे इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यानंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
मुलीच्या वडिलांनी शेत गहाण ठेवून लग्नाची तयारी केली होती. लग्नासाठी लॉनही बुक करण्यात आले होते. परंतु, लग्नाच्या आदल्या दिवशी, 15 फेब्रुवारीला मुलाने फोन करून लग्नास नकार दिला. तसेच, मुलाकडील लोकांनी स्विफ्ट डिझायर गाडीची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
10 ऑगस्ट 2024 रोजी साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. मात्र, लग्न ठरल्यानंतर नवरी मुलगी इंस्टाग्रामवर रिल्स टाकत असल्याने नवरदेवाने लग्न मोडल्याचे सांगितले जातेय. या प्रकरणी शाहजहांपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. आता पोलिसांनी दोघांचे जबाब घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा :
लोकलमध्ये धक्का लागल्याने वाद! धावत्या लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला, तीन प्रवासी जखमी
महापालिका निवडणुकीपूर्वीच ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गटाला बसणार धक्का
महाशिवरात्रीला उपवासात ‘हे’ आहार तुम्हाला दिवसभर ठेवतील ताजेतवाने, जाणवणार नाही थकवा