अभिषेक बच्चनचे या अभिनेत्रीसोबत अफेअर? एकीकडे ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाची चर्चा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री(actress) ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या स्टार कपलमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असेही बोलले जाते आहे की या दोघांचा घटस्फोट होणार आहे. अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नसला तरी गेल्या काही महिन्यात खूपच कमी वेळा ते एकत्र स्पॉट झाले आहेत.

ऐश्वर्या(actress) अनेकदा तिच्या मुलीसोबत दिसून येते, तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अभिषेक त्याच्या कुटुंबासमवेत पोहोचते, मात्र त्याच्यासोबत ऐश्वर्या नसते. या दरम्यान सोशल मीडियावर भलताच दावा केला जातो आहे. अभिषेकचे नाव त्याच्या एका सहकलाकारासोबत जोडले गेले आहे.

सोशल मीडियावर विविध पोस्टमधून असा दावा केला जात आहे की अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निमृत कौर एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या रिलेशनशिपची अफवा पसरल्याने निमृतला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. तिच्या विविध पोस्टवर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी टीकाही केली आहे.

अभिषेक बच्चनसोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्याने निमृत कौर सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. अलीकडेच ती एका इव्हेंटदरम्यान स्पॉट झाली होती. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओवर असंख्य कमेंट तिच्या आणि अभिषेकच्या नात्याविषयीच आहेत. अनेकांनी ही अफवा खरी आहे का, असा सवाल केला आहे, तर काहींनी थेट तिच्यावर टीका केली आहे.

विरल भयानीने शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओवर एकाची कमेट आहे की, ‘ही आता निमृत बच्चन होण्याची आशा करते आहे.’ अन्य एकाने लिहिले की, ‘ऐश्वर्याचा संसार मोडला.’ एकाने कमेंट करत निमृतला ‘ऐश्वर्याची सवत’ म्हटले आहे. काहींनी असे विचारले आहे की, अभिषेक आणि निमृत यांचे नाव एकत्र का जोडले जात आहे? एकंदरित सध्या निमृत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

निमृत आणि अभिषेक यांच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अलीकडेच ते ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांचा हा सिनेमा चांगलाच लोकप्रियही ठरला.

हेही वाचा :

ठाकरे- काँग्रेस वाद विकोपाला; शरद पवार काढणार तोडगा

सकाळच्या नाश्त्यात बनवा कुळीथाच्या पीठापासून व्हेजिटेबल थालीपीठ

तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; ‘या’ 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू