“माझ्याशी लग्न कर” घटस्फोटीत महिलेवर बलात्कार; रीलस्टारचा आणखी एक दुष्कृत्य समोर

डोंबिवलीतील रीलस्टार(Reelstar) सुरेंद्र पाटील याचं आणखी एक दुष्कृत्य समोर आलंय. सुरेंद्र पाटील याच्या गाळयात व्यवसाय करणाऱ्या घटस्फोटीत महिलेवरच सुरेंद्र पाटीलनं बलात्कार केलाय. थकलेले भाडे देऊ नको आणि तुझी मशिनरी परत करतो असे आमिष दाखवत सुरेंद्र पाटील याने पिडीतेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेंद्र पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात देखील एअरहोस्टेसने सुरेंद्र पाटील विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सुरेंद्र पाटील अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
डोंबिवलीत राहणारा कुप्रसिद्ध रीलस्टार(Reelstar) सुरेंद्र पाटील हा आपल्या वादग्रस्त रिल्समुळे चर्चेत असतो. दोन दिवसांपूर्वीच सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणीने गुन्हा दाखल केला होता. एअर होस्टेसवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल केल्यापासून सुरेंद्र पाटील फरार आहे.

मानपाडानंतर त्याच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाघटस्फोटीत महिलेने सुरेंद्र पाटील याच्यावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केलाय. सुरेंद्र पाटील याचा ठाकुरली परिसरात गाळा आहे. या गाळ्यामध्ये घटस्फोटीत महिला द्रोण आणि कागदाचे प्लेट बनवण्याचा व्यवसाय करत होती. मात्र, व्यवसायात नुकसान झाल्याने तिने हा व्यवसाय बंद केला. या गाळ्याचे काही महिन्याचे भाडे देखील थकलेले होते.तसेच तिची मशिनरी देखील या गाळ्यात अडकून पडली होती.

महिलेने मशिनरी मागताच सुरेंद्रने भाड्याचा तगादा लावला. काही दिवसांनी सुरेंद्रने भाडं माफ करतो आणि तुझी मशिनरी देतो, माझ्याशी लग्न कर असे सांगत घटस्फोटीत महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डोंबिवली रामनगर पोलीस सध्या सुरेंद्र पाटील याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
दारूसाठी पैसे दिले नाही, नवरा संतापला; शेतात अर्धनग्न करून विटेने मारहाण
मोहम्मद शमी अडचणीत! हसीन जहाँने केले गंभीर आरोप
मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट गुन्हा दाखल होणार