Maruti Brezza की Tata Nexon, कोणती कार देते जास्त मायलेज?

पूर्वीचा काळ असो की आताच काळ, अनेक ग्राहक जेव्हा नवीन किंवा जुनी (car)कार खरेदी करायला जातात, तेव्हा सर्वप्रथम एक गोष्ट आवर्जून पाहत असतात ते म्हणजे कारचा मायलेज. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या जास्तीतजास्त मायलेज देणाऱ्या कार्स मार्केटमध्ये उपलब्ध करून देत असतात.

सध्या मार्केटमध्ये (car)टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा जास्त चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज. जेव्हा आपण कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटबद्दल बोलतो तेव्हा मारुती सुझुकी ब्रेझा आणि टाटा नेक्सॉनची नावे आपसूक डोळ्यासमोर येतात, जी खूप लोकप्रिय वाहने आहेत.

मारुती सुझुकी ब्रेझा हे उत्तम मायलेजसाठी ओळखले जाते तर टाटा नेक्सॉनला ताकद आणि सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. या दोन्ही वाहनांची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

जर तुम्ही या दोन्ही वाहनांपैकी कोणतीही एक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला दोन्ही कारच्या सेफ्टी, परफॉर्मन्स आणि मायलेजबद्दल सांगणार आहोत.

मारुती ब्रेझा ही हायब्रीड कार आहे. ही कार K15 C पेट्रोल + CNG (बाय-फ्युएल) इंजिनसह येते, ज्यामुळे ती पेट्रोल आणि CNG दोन्ही मोडमध्ये चालविली जाऊ शकते. या कारमध्ये बसवलेले इंजिन पेट्रोल मोडमध्ये 6,000 rpm वर 100.6 PS ची पॉवर प्रदान करते आणि 4,400 rpm वर 136 Nm टॉर्क जनरेट करते.

तर CNG मोडमध्ये, ही कार 5,500 rpm वर 87.8 PS चा पॉवर आणि 4,200 rpm वर 121.5 Nm टॉर्क मिळवते. मारुतीची ही कार 25.51 km/kg चा मायलेज देते.

टाटा नेक्सॉन ही हायब्रीड कार नाही आहे. पण ही कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनच्या पर्यायासह येते. या टाटा कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिन आहे. हे इंजिन 5,500 rpm वर 88.2 PS ची शक्ती प्रदान करते आणि 1,750 ते 4,000 rpm वर 170 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 17 ते 24 kmpl चा मायलेज देते.

Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.50 लाखांपर्यंत जाते. तर Maruti Brezza ची किंमत 8.34 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.14 लाख रुपयांपर्यंत जाते. Tata Nexon ला ग्लोबल NCAP कडून क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर मारुती ब्रेझाला 4-स्टार सेफ्टी रेटिंग आहे. Tata Nexon ची बूट-स्पेस 382 लीटर आहे. तर Brezza मध्ये 328 लीटरची बूट स्पेस आहे.

हेही वाचा :

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

राजयोग! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खायचा असेल तर घरी बनवा पनीरटिक्का रोल