Maruti च्या ‘या’ कारने ग्राहकांना पाडली भुरळ

देशात अनेक उत्तम कार(car) उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार दमदार कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेतल्यामुळे या कार्सना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. देशात अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी उत्तम कार्स ऑफर करत आहे. उत्तम मायलेज, आणि बजेट फ्रेंडली कार्स ऑफर करण्यासाठी कंपनी ओळखली जाते. आता कंपनीच्या एका कारने विक्रीची रेकॉर्डस् तोडले आहे.

मारुती सुझुकी इंडिया(car) लिमिटेडने नवीन वर्षाच्या आधी विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे ज्यानुसार डिझायर सेडानसाठी 3 मिलियन युनिट्स विकल्या गेल्या आहेत. कंपनीला ही महत्त्वाची कामगिरी साधारणत: 16 वर्षे 11 महिन्यांत मिळाली आहे. यापूर्वी, Dzire ने एप्रिल 2015 मध्ये 1 मिलियन युनिट्सचे उत्पादन केले होते आणि जून 2019 मध्ये 2 मिलियन युनिट्सचे उत्पादन गाठले होते. 3 मिलियन उत्पादनाचा टप्पा गाठणाऱ्या कंपनीच्या मॉडेल्समध्ये अल्टो, स्विफ्ट आणि वॅगनआर यांचा समावेश आहे.

पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट LXi साठी ₹6.79 लाख, VXi साठी ₹7.79 लाख, ZXi साठी ₹8.89 लाख आणि ZXi Plus साठी ₹9.69 लाख पासून सुरू होतात. ऑटोमेटेड गिअर शिफ्ट (AGS) व्हेरियंटची किंमत VXi साठी ₹ 8.24 लाख, ZXi साठी ₹ 9.34 लाख आणि ZXi Plus साठी ₹ 10.14 लाख आहे. CNG ऑप्शनसाठी, VXI CNG ची किंमत ₹8.74 लाख आहे आणि ZXI CNG ची किंमत ₹9.84 लाख आहे. या सर्व किंमती इंट्रोडक्टरी किंमती आहेत ज्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत व्हॅलिड आहेत.

2024 Dzire मध्ये मोठ्या फ्रंट ग्रील, LED डेटाइम रनिंग लाइट्स, Y-आकाराचे LED टेल लॅम्प आणि 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हीलसह आकर्षक डिझाइन आहे. या कारमध्ये डायमेन्शन समान राहतील, लांबी 3,995 मिमी, रुंदी 1,735 मिमी, उंची 1,525 मिमी, व्हीलबेस 2,450 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 163 मिमी आणि बूट स्पेस 382 लिटर आहे.

सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Dzire मध्ये मजबूत स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि पादचारी संरक्षण समाविष्ट आहे. याशिवाय या कारला ग्लोबल एनसीएपी टेस्टिंगमध्ये 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. त्यामळे जेव्हा सुरक्षित ड्राईव्हची गोष्ट येते तेव्हा ग्राहक मारुती सुझुकीच्या नवीन डिझायरला पहिले प्राधान्य देताना दिसतात.

हेही वाचा :

चाहत्यांना खास ईद देण्याच्या तयारीत भाईजान…

सरांचा शिकवण्याचा पॅटर्न सोशल मीडियावर चर्चेत; पावडर घेतली, तोंडाला लावली अन्…

ऑनलाईन कामातून भरघोस कमाईची संधी, शिक्षण घेत असताना करता येणार Part Time Jobs