मारुती डिझायरला टक्कर ह्युंदाई आणि होंडाच्या गाड्यांचे मायलेज आणि किंमत
मारुती सुझुकी ही कार उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये (manufacturer)मारुतीने सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक खपाची गाडी असलेल्या मारुती डिझायरचा अपडेटेड व्हॅरिएंट सादर केला. हा व्हॅरिएंट पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हॅरिएंट २४.७९ किमी प्रति लिटर मायलेज देतो, तर सीएनजी व्हॅरिएंट ३३.७३ किमी प्रति किलो मायलेज देतो. मारुती डिझायरला बाजारात होंडा आणि ह्युंदाईच्या कोणत्या गाड्या स्पर्धा करतात, हे आपण पाहूया.
मारुतीच्या गाड्या जास्त मायलेज देणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. परंतु, मारुतीच्या गाड्यांमध्ये होंडा आणि ह्युंदाईच्या तुलनेत कमी फिचर्स असतात आणि त्या दिसायलाही थोड्या कमी आकर्षक असतात, असा एक समज आहे. आता आपण मायलेज आणि किमतीच्या आधारे या गाड्यांची (manufacturer)तुलना करूया.मारुती डिझायर: बेस व्हॅरिएंट – ₹६.७९ लाख, टॉप व्हॅरिएंट – ₹१०.१४ लाख
ह्युंदाई व्हेन्यू : बेस व्हॅरिएंट – ₹७.९४ लाख, टॉप व्हेरिएंट – ₹१३.६२ लाख
होंडा सिव्हिक डिझेल: बेस व्हॅरिएंट – ₹२०.५६ लाख, टॉप व्हॅरिएंट – ₹२२.३६ लाख
मायलेजची तुलना
मारुती डिझायर: पेट्रोल – २४.७९ किमी/लीटर, सीएनजी – ३३.७३ किमी/किलो
ह्युंदाई व्हेन्यू: पेट्रोल – १८.३१ ते २४.२ किमी/लीटर, डिझेल – २४.२ किमी/लीटर
होंडा सिव्हिक डिझेल: २६.८ किमी/लीटर
ह्युंदाई व्हेन्यू आणि होंडा सिव्हिक मारुती डिझायरला कशी टक्कर देतात?
ह्युंदाई व्हेन्यू ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही मायलेजच्या बाबतीत मारुती डिझायरशी चांगली स्पर्धा करते. ARAIच्या माहितीनुसार ह्युंदाई व्हेन्यूचे पेट्रोल व्हॅरिएंट १८.३१ ते २४.२ किमी प्रति लिटर एवढे मायलेज देते, तर डिझेल व्हॅरिएंट २४.२ किमी प्रति लिटर मायलेज देते.होंडा सिव्हिक डिझेल सेडान (manufacturer)सेगमेंटमध्ये असून, तिच्या लक्झरी लूकसाठी ओळखली जाते. ARAIच्या माहितीनुसार होंडा सिव्हिक डिझेल २६.८ किमी प्रति लिटर मायलेज देते.
गाडी खरेदी करताना ग्राहक लूक, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आदींचा विचार करतातच, परंतु मायलेजचा विचार प्रामुख्याने केला जातो. कारण जास्त मायलेज म्हणजे गाडी वापरण्याचा खर्च कमी. याच कारणामुळे मारुती सुझुकीच्या गाड्या जास्त लोकप्रिय आहेत.जर तुम्ही प्रामुख्याने मायलेज आणि कमी किमतीला प्राधान्य देत असाल, तर मारुती डिझायर हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट एसयूव्ही हवी असेल आणि थोडे जास्त पैसे मोजायची तयारी असेल, तर ह्युंदाई व्हेन्यूचा विचार करू शकता. आणि जर तुम्हाला लक्झरी लूक आणि आरामदायी सेडान हवी असेल, तर होंडा सिव्हिक डिझेल तुमच्यासाठी योग्य ठरेल.
हेही वाचा :
या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता कर्जही मिळणार
डॉक्टर नवऱ्यानेच रचला बायकोच्या हत्येचा कट, मेहुणीसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे…
महिला उद्योजाकांना सरकारची साथ ! मिळणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज, अर्थमंत्र्यांची घोषणा