Maruti Grand Vitara 7-सीटर लवकरच येणार; नव्या डिझाइनसह व्हॅन स्पॉट
भारतात अनेक उत्तम कार्स मार्केटमध्ये दाखल होताना दिसत आहे. या कार्स (car value)ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार डिझाइन करण्यात येतात. त्यामुळेच मार्केटमध्ये लाँच झाल्यावर या कार्सच्या मागणीत जोरदार वाढ होते. लवकरच मारुती सुझुकीची Grand Vitara 7 सीटर व्हेरियंटमध्ये लाँच होणार आहे.मारुती सुझुकी ही देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या उत्तम आणि हाय परफॉर्मन्स कार्समुळे ओळखली जाते. कंपनी अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांसाठी त्याच्या आवश्यकतेनुसार कार लाँच करत आहे. 2025 हे वर्ष गाजवण्यासाठी सुद्धा कंपनी आता सज्ज आहे. येत्या नवीन वर्षात कंपनी आपली दमदार 7 सीटर एसयूव्ही मार्केटमधे आणायची तयारी करताना दिसत आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया
दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ग्रँड विटाराचे 7 सीटर व्हेरियंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 7 सीटर ग्रँड विटारा पुढील वर्षी म्हणजेच 2025 च्या मध्यात भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. न्यूज वेबसाइट gaadiwaadi मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पहिली 7 सीटर विटारा लाँच होण्यापूर्वी पहिल्यांदाच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. 3-रो ग्रँड विटाराच्या संभाव्य फीचर्सबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.
या स्पॉटेड 7-सीटर Vitara दाखवते की कारच्या पुढील बाजूस नवीन LED DRL आणि हेडलॅम्पसह स्प्लिट लाइटिंग युनिट समाविष्ट आहे. तर बंपर देखील नवीन एअर टेकसह पुन्हा (car value)डिझाइन केले गेले आहे. त्याच वेळी, कारचे बूट गेट आणि मागील बंपर देखील अपडेटेड केले गेले आहेत. याशिवाय एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, एसयूव्हीच्या केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोलचा समावेश असेल. SUV मध्ये मोठी टचस्क्रीन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा सिस्टम देखील असेल. त्याच वेळी, पॉवरट्रेन म्हणून, SUV मध्ये 1.5L 4-सिलेंडर K15C माईल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि 1.5L 3-सिलेंडर मजबूत-हायब्रिड पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. यावरून आपण असा अंदाज बंधू शकतो की ही एसयूव्ही नक्कीच चालकाला (car value) एक उत्तम रायडींगचा अनुभव देणार आहे.अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी 7 सीटर ग्रँड विटाराची एक्स-शोरूम किंमत 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. बाजारात, 3-रो ग्रँड विटारा टाटा सफारी, MG हेक्टर प्लस, महिंद्रा XUV700 आणि Hyundai Alcazar सारख्या SUV ला ही एसयूव्ही टक्कर देईल.
हेही वाचा :
तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा
मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा
थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे