मस्ती मस्ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन्… थरकाप उडवणारा Video Viral

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. इथे बरेच नवनवीन व्हिडिओ शेअर केले जातात. यात बऱ्याचदा काही दुर्घटनांचे आणि अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर होतात. या अकस्मात घटना अनेकदा इतक्या धक्कादायक असतात की त्यातील दृश्ये आपल्याला अचंबित करून सोडतात. सोशल मीडियावर अनेक वेळा लोक नको ते करायला जातात आणि स्वतःच बरंवाईट करून बसतात. याचेच आणखीन एक उदाहरण आता इथे व्हायरल होत आहे .

आपण केलेली मस्ती अनेकदा आपल्यावरही उलटू शकते त्यामुळे मस्ती ही विचार, वेळ आणि जागा बघून करावी. स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी लोक आपला जीव पणाला लावतात आणि मग दुर्घटनेस बळी पडतात. आताच्या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. यात तरुणीसोबत एक मोठी दुर्घटना घडली असून ती यावेळी 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून धडाधडा खाली कोसळल्याचे दृश्य दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवतील.

नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये(Video) तुम्ही पाहू शकता, यात एक तरुणी जिन्यावर स्टंट करत असल्याचे दिसते. यावेळी ती जिन्यांच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर बसून घसरत घसरत मस्करी करू पाहते मात्र पुढच्याच क्षणी ही मस्करी तिच्या जीवावर बेतते. पुढे तुम्ही पाहू शकता, रेलिंगवरून खाली घसरत असताना अचानक तिचा जातो आणि ती तशीच उलटी होऊन जिन्यावरून खाली कोसळत जाते. मुख्य म्हणजे, व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून कोसळल्याचे समजते.

तरुणीचा हा व्हायरल व्हिडिओ @__.magnanimous नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भितीदायक दृश्य!’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काही लोक प्रत्येक गोष्टीला हलक्यात घेतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओ माय गॉड, आयुष्यासोबत असे खेळले नाही पाहिजे”.

हेही वाचा :

‘मी देवेंद्र फडणवीसांकडे पदर पसरणार…’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

बुधवारी शिवजयंतीनिमित्त शाळा आणि बँका बंद असणार का?

250 रुपयांत SIP योजना, गुंतवणूकदारांना मोठी संधी