आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट
हवामान विभागाने आज सोमवारी विदर्भासह मराठवाड्यातील (department)काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी केला आहे.जुलै महिन्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काहीशी विश्रांती घेतली. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी अजूनही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. हवामान विभागाने आज सोमवारी विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या ईशान्य राजस्थान आणि परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. मान्सूनचा आस ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून ते (department)कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे.
11 Aug,IMD model guidance for Total Rainfall for nxt 3 days (11-14 Aug) & subseq 4 days (15-19 Aug).Possibility of good rainfall in area of GWB;WB,UP, Bihar,Sikkim,parts of Uttarakhand & parts of NE region. Parts of southern peninsula also#Maharashtra light to mod rains possibly pic.twitter.com/xcGQYhZDFm
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2024
त्यामुळे आज सोमवारी महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी (department)कोसळल्या होत्या. रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील शेतीकामांचा खोळंबा झाला होता.हवामान खात्याने विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा:
श्रावणी सोमवारचा विशेष: उपवासासाठी साबुदाणा रबडी बनवा
लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार? रक्षाबंधन की, भाऊबीज?
कागलमध्ये महायुतीचं ठरलं! अजितदादांकडून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा