हवामान खात्याचा इशारा: राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने आज कोकण किनारपट्टीसह विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज देखील हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची(heavy rain)शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकाडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे, पुण्यासह, कोल्हापूरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती.

पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा :

‘मिर्झापूर 3’ चा थरारक तिसरा पर्व रिलीज !

स्वागताचा अतिउत्साह! क्रिकेटप्रेमींना रोखताना पोलिसांची दमछाक,

Jio, Airtel आणि Vi ने आपले रिचार्ज प्लान्स महाग, मात्र ही कंपनी देतेय स्वस्त रिचार्ज