बाईक चालवताना खिशातल्या मोबाईलचा स्फोट; भंडाऱ्यातील मुख्यध्यापकाचा मृत्यू! 

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एका विचित्र अपघातात एका मुख्यधापकाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव/टोला येथे घडली आहे. मोटारसायकलवरुन जाताना मोबाईल(Mobile) फोनचा स्फोट होऊन एकाचा दुर्देवी मृत्यु तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सध्या पंचक्रोषीत चर्चा आहे. मयत व्यक्ती जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यात शुक्रवारी सिरेगाव टोला येथील सुरेश संग्रामे व त्यांचा मित्र नथ्थू गायकवाड हे दुचाकीवरुन जात होते. अचानक सुरेश यांच्या शर्टच्या खिश्यात ठेवलेला त्यांचा मोबाइल फुटला. स्फोट होऊन कपड्याला आग लागली. अचानक मोबाईलचा(Mobile) स्फोट झाल्याचं या दोघांनाही आधी कळचं नाही. काही कळण्याआधीच सुरेश या स्फोटात जखमी झाले.

स्फोटामुळे आग लागल्याने सुरेश यांच्या छातीला भाजलं आणि त्यांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात हलविले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. दुचाकीवर सुरेश यांच्या मागे बसलेले नथ्थू गायकवाड हे अचानक स्फोट झाल्याने गाडीवरुन खाली पडले. नथ्थू हे गंभीर जखमी झाले असून त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मोबाईलमध्ये स्फोट होण्याची बहुतेक प्रकरणे ही बॅटरीशी संबंधित असतात, असं तज्ज्ञ सांगतात. मोबाईल अनेक तास चार्जिंगला ठेवल्याने बॅटरी जास्त चार्ज होते. हेच मोबाईलच्या स्फोटाचे प्रमुख कारण ठरते. याशिवाय मोबाईल जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो. या प्रकरणात असेच काहीतरी घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

लिथियम आयन बॅटरीचा मोबाईलमध्ये वापर केला जातो. ही रिचार्जेबल बॅटरी आहे. लिथियम कोबाल्ट ऑक्साईडपासून मोबाईलच्या बॅटरी बनलेल्या असतात. त्यामुळे त्यात हाय डेन्सीटी एनर्जी असते. जेव्हा हे लिथियम कोबाल्ट ऑक्साईड चार्ज होतात तेव्हा ते खूप उष्णता सोडतात. तसेच प्रत्येक बॅटरीची चार्ज करण्याची एक ठराविक क्षमता असते. बॅटरीला क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टच्या चार्जरने चार्ज केल्यावर बॅटरी गरम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोबाईल फोनच्या अंतर्गत मदरबोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट होऊ शकतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे मोबाईल जपून वापरणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून विरोधात गुन्हा दाखल

आज शनिवारी, महादेव ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

अजित पवारांना मोठा दिलासा; एक हजार कोटींची मालमत्ता मुक्त होणार