गजब बेइज्जती है यार…! हस्तांदोलनासाठी मोदींकडून हात पुढे, पण फ्रान्सच्या अध्यक्षांचं दुर्लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असून, विविध उच्चस्तरीय बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. बुधवारी ते फ्रान्सचे अध्यक्ष(President) इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटनासाठी मार्सेल येथे पोहोचले. या दौऱ्यात एक प्रसंग घडला असून, त्यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मोदी आणि मॅक्रॉन यांनी एआय अॅक्शन समिटला संबोधित केले तसेच भारत-फ्रान्स सीईओ फोरममध्ये भाग घेतला, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. याशिवाय पंतप्रधान मोदींनी मजारग्यूज युद्ध स्मशानभूमीला भेट देत जागतिक युद्धातील बलिदानी भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर प्रकल्प पाहण्यासाठीही गेले.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मॅक्रॉन पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन न करता इतर जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेससह काही विरोधकांनी हा व्हिडिओ शेअर करत मॅक्रॉन यांनी मोदींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

मात्र, हा व्हिडिओ एका मोठ्या दृश्याचा छोटा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक, मॅक्रॉन आणि मोदी कार्यक्रमस्थळी एकत्र पोहोचले होते. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी(President) मोदींचे स्वागत केले, हात हलवले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमस्थळी प्रवेश करत असताना हा व्हिडिओ काढण्यात आला, ज्याचा काही भाग वेगळ्या संदर्भात व्हायरल झाला.

फ्रान्स दौऱ्यादरम्यान मोदी-मॅक्रॉन यांच्या बैठकीत महत्त्वाचे आर्थिक व तांत्रिक सहकार्य विषयक चर्चा झाली असून, भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार

मोबाईल रिचार्ज आता स्वस्त होणार, ट्रायच्या नवीन नियमामुळे ग्राहकांना दिलासा

महाराष्ट्र हादरला! मित्राने घरातून पळवून आणलं अन्…,अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार