दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!
देशभरातील अनेक तरुणांना स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारकडून(govt loan scheme) प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधता यावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या तरुणांना आणि उद्योजकांना पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत(govt loan scheme), मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख करण्यात येईल. आता या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत. ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा शिशु योजनेंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज दिले जाते.
तरुण योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे आता उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक ते भांडवल सरकारकडून उपलब्ध करून दिले जाते. यामुळे अर्थव्यवस्थेत रोजगारनिर्मितीला चालना मिळते आणि देशाचा आर्थिक विकास होण्यास देखील मदत होते.
हेही वाचा :
दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर रोजी?
‘रोहित निगेटीव्ह कर्णधार असून…’, Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं
6 वर्षानंतर दया पुन्हा दिसणार; ‘CID’चा दमदार कमबॅक, शो लवकरच चाहत्यांच्या भेटीला