विधानसभेपूर्वीच मोदींचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट…

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत(projects). शुक्रवारी (16 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या निर्णयामुळे पुणे आणि ठाणेकरांना मोठा लाभ होणार आहे.

केंद्राने महाराष्ट्रासाठी 3 मोठे निर्णय(projects) घेतले आहेत. यामध्ये वाढवण बंदराचाही समावेश असून यासाठी 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर पुण्यातील मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या विस्तारालाही मंजुरी दिली आहे. स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमी लांबीच्या विस्तारास ही मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल 2,954.53 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.हा प्रकल्प 2029 सालापर्यंत पूर्ण होणार आहे. याचसोबत ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला देखील मंजूरी मिळाली आहे. हा प्रकल्प 12,200 कोटीचा असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडण्यात येणार आहे.

ठाणे इंटग्रिल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प-
प्रकल्पाचा खर्च- 12,200 कोटी रुपये
मार्ग लांबी- 29 किमी, त्यापैकी 26 किमी उन्नत आणि तीन किमी भूमिगत
स्थानके- 22, त्यापैकी 20 उन्नत आणि 02 भुयारी
लाभ काय होणार?- या प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.तसेच शहरातील विविध भागांशी थेट रिंग मेट्रो मार्गाने प्रवास शक्य होईल.

केंद्राचे महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय-
वाढवण बंदर
: या प्रकल्पासाठी तब्बल 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात आला आहे.

पुणे मेट्रो फेज-1 : या प्रकल्पाच्या दक्षिणेकडे स्वारगेट ते कात्रज पर्यंत 5.46 किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 2,954.53 कोटी रुपये यासाठी खर्च केले जातील. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.

हेही वाचा :

‘एकातरी लाडकी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा’; सुप्रिया सुळेचं आव्हान

हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाच्या डेटची चर्चा; नताशा स्टॅनकोविकची पोस्ट

‘जया बच्चन पागल!’ असं का म्हणाला सलमान खान, नेमकं काय घडलं?