मोहम्मद शामीचे भारतीय संघात होणार लवकरच पुनरागमन!
मोहम्मद शामीचे पुनरागमन : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी(team) सध्या त्यांच्या दुखापतींशी झुंज देत आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे झालेल्या T२० विश्वचषकाचा सुद्धा शामी भाग नव्हता.
मागील वर्षांपासून तो बराच काळ क्रिकेट (team)पासून दूर आहे आणि तो त्याच्या इंज्युरी संदर्भात सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती देत असतो. आता लवकरच मोहम्मद शामी भारतीय क्रिकेट संघामध्ये पुनरागमन करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी शमी संघात पुनरागमन करू शकतो.
भारताच्या संघाने कदिवसीय विश्वचषक २०२३ यामध्ये फायनल गाठली होती. यावेळी भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. एकदिवसीय विश्वचषकामध्ये सुरुवातीच्या सामन्यामध्ये मोहम्मद शामीला टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते त्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर मोहम्मद शामीला संधी देण्यात आली होती. त्यावेळी शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अवघ्या सात सामन्यांमध्ये २४ बळी घेणारा आघाडीचा गोलंदाज होता.
मीडियाच्या माहितीनुसार शमी दुखापतीतून बरा झाला आहे. एका अहवालानुसार, शमी सध्या एनसीएमध्ये त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि गेल्या महिन्यात त्याने गोलंदाजी सुरू केली आहे. तंदुरुस्त झाल्यानंतर शमीने हळूहळू त्याच्या गोलंदाजीवर कामाचा ताण वाढवला असल्याचे अहवालात म्हटले आहे. या संदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली होती.
मोहम्मद शामीने त्याच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. तो त्याच्या दुखापतीमधून बऱ्यापैकी सावरताना दिसत आहे. त्यामुळे आता शमी कधी संघामध्ये पुनरागमन करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा:
सीरियल किलरचा खुनी खेळ! महिलांना प्रेमात पाडायचा अन्…
अजितदादांची बुलेट सवारी; म्हणाले, तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन…Video
‘घालीन लोटांगण, वंदिन चरण’, उद्धव ठाकरेंच्या सभेआधी विरोधकांकडून बॅनरबाजी